Love Hostel | बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका!

| Updated on: Feb 06, 2021 | 12:51 PM

केंद्र सरकारने पास केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचा फटका पंजाबमधील चित्रपटाच्या शूटिंगला बसत आहे.

Love Hostel | बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका!
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने पास केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचा फटका पंजाबमधील चित्रपटाच्या शूटिंगला बसत आहे. नुकताच एक बातमी आली आहे, पंजाबमध्ये आपल्या ‘लव हॉस्टल’ (Love Hostel) चित्रपटाचे बॉबी देओल (Bobby Deol) शूटिंग करत होता. याची माहिती शेतकरी आंदोलकांना लागली आणि शेतकऱ्यांनी आपला मोर्चा चित्रपटाच्या सेटकडे वळवला त्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत देशात लावण्यात आलेले नवे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होऊ देणार नाहीत. (The shooting of Bobby Deol’s Love Hostel movie which is going on in Punjab has stopped)

या चित्रपटाच्या सेटवर बॉबी देओलला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इतकेच नाही तर बॉबी देओल समोर शेतकरी म्हणाले की, तुमचा भाऊ सनी देओल एक अभिनेता तसेच पंजाबमधील गुरदासपूर येथील भाजपचा खासदार देखील आहे. मात्र, तेही आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत. शेतकरी आंदोलकांनी पंजाबमधील चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याची ही पहिली वेळ नसून या अगोदरही जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

बॉबी देओल स्टारर चित्रपट लव हॉस्टलमध्ये विक्रांत मस्से आणि सान्या मल्होत्रा ​​देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमण करत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी देखील या चित्रपटाची सह-निर्माता आहे. बॉबी देओलची ‘आश्रम’ वेब सीरीजला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आहे. या वेब सीरीजमध्ये बॉबीचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे.

संबंधित बातम्या : 

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !

कोरोना काळातही रणवीर सिंहची कमाई वाढली, 9 नवीन ब्रँडने केला करार!

(The shooting of Bobby Deol’s Love Hostel movie which is going on in Punjab has stopped)