AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्यातील सिझलिंग केमिस्ट्री…, सारा अली खान सोबत इंटिमेट सीन, विजय वर्माचं मोठं वक्तव्य

Sara Ali Khan | सारा अली खान हिच्यासोबत पहिल्यांदा इंटिमेट सीन, विजय वर्मा म्हणाला, 'आमच्यातील सिझलिंग केमिस्ट्री..., ' सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विजय वर्मा आणि सारा अली खान यांच्या आगामी सिनेमाची चर्चा...

आमच्यातील सिझलिंग केमिस्ट्री..., सारा अली खान सोबत इंटिमेट सीन, विजय वर्माचं मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 15, 2024 | 9:39 AM
Share

मुंबई | 15 मार्च 2024 : अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या आगामी ‘मर्डर मुबारक’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर चाहत्यांना पाहता येणार आहे. सिनेमात सारा आणि विजय यांचे इंटिमेट सीन आहेत. म्हणून दोघांमधील केमिस्ट्रीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये सुरु आहे. सिनेमा हॉरर थ्रिलर असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, विजय वर्मा याने सारा अली खान हिच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विजय म्हणाला, ‘सिनेमाची कथा रोमान्स, हॉरर थ्रिलर भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमाच्या सेटवर मी सारा पूर्णपणे वेगळे होतो. आम्ही एकमेकांसोबत मस्ती,, मस्करी करत होतो… त्यामुळे मला कधीच वाटलं नव्हतं आमच्यात सिझलिंग केमिस्ट्री दिसू शकते. पण एखाद्या पॅशनेट सीनमध्ये…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा मी विचार केला सारा पूर्णपणे तिच्या भूमिकेत गेली होती. तिने मला तिच्याजवळ खेचलं आणि आम्ही एक सिझलिंग सीन दिला… तेव्हा मला कळलं जेव्हा दोन कलाकार एकमेकांसोबत स्वतःला सुरक्षित समजतात तेव्हाच त्याच्यातील केमिस्ट्री पॅशनेट होते.’

‘आम्ही इंटिमेट सीन दिला आणि दुसऱ्या क्षणाला खास मित्रांप्रमाणे आमच्यात मस्ती सुरु झाली…’ असं विजय वर्मा म्हणाला. सांगायचं झालं याआधी विजय याने अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान हिच्यासोबत ‘जाने जान’ सिनेमात इंटिमेट सीन दिले आहेत. आता सैफ अली खान याच्या मुलीसोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे विजय चर्चेत आहे. सिनेमात करिश्मा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे.

‘मर्डर मुबारक’ सिनेमा

‘मर्डर मुबारक’ सिनेमात करिश्मा कपूर हिच्यासोबत सारा अली खान, पंकज त्रिपाठी यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं आहे. सिनेमा 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा अली खान हिचे आगामी सिनेमे

सारा लवकरच दोन सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ सिनेमा सारा झळकणार आहे. सध्या सध्या तिच्या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहे. चाहते देखील साराला नव्या भूमिकेत पाहाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...