AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार कुटुंबातील Flop अभिनेता, पण उत्तम मार्गाने कमावतो कोट्यवधींची माया, जाणून व्हाल हैराण

कुटुंब इंडस्ट्रीमधील आहे म्हणून यश मिळेलच असं नाही... कुटुंबिय प्रसिद्ध सेलिब्रिटी, पण 'या' अभिनेत्याला नाही मिळालं यश, अनेक उत्तम मार्गाने कमावतो कोट्यवधी रुपये... नेटवर्थ जाणून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

स्टार कुटुंबातील Flop अभिनेता, पण उत्तम मार्गाने कमावतो कोट्यवधींची माया, जाणून व्हाल हैराण
| Updated on: Mar 15, 2024 | 8:53 AM
Share

मुंबई | 15 मार्च 2024 : अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. पण यश प्रत्येकाला मिळतं असं काहीही नाही… आता देखील अशा एका स्टारकिडची चर्चा रंगली आहे, ज्याचे कुटुंबिय प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिने अभय देओल आहे. अभय याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्याला यश मिळालं नाही. आता अभय बॉलिवूडपासून दूर आहे, पण अनेक मार्गांनी कोट्यवधींची माया कमावतो…

सनी – बॉबी देओल यांच्यासोबत खास कनेक्शन

बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल हे अभयचे चुलत भाऊ आहेत. धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. अभय देओलने 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभय देओलने ‘सोचा ना था सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली होते आणि आयशा टाकिया या सिनेमात अभय याच्यासोबत झळकली होती.

अभय देओल याचे सिनेमे

अभय देओल याने ‘देव डी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘आयशा’, ‘हॅप्पी भाग जाएगी’, ‘ओए लकी, लकी ओए’, ‘रांझणा’, ‘शंघाई’, ‘चक्रव्यूह’, ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’ ‘चॉपस्टिक्स’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘आहिस्ता-आहिस्ता’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

अभय याने स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही. अभिनेता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय आहे. ‘ट्रायल बाय फायर’, ‘जंगल क्राई’, मेजर माइनर्स’, ‘स्पिन’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये अभय याने काम केलं आहे. आज अभय याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.

अभय देओल याची संपत्ती

रिपोर्टनुसार, अभय देओल याच्याकडे जवळपास 400 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभय अभिनयातून कमी तर, उद्योगातून अधिक कमाई करतो. अभय याने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. शिवाय अभय याचे हॉटेल देखील आहेत. अभय जाहिरातींच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करतो…

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा आकडा देखील अभिनेत्याचा फार मोठा आहे. अभय याचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभय अजूनही सिनेमांमध्ये सक्रिय आहे आणि OTT वरील अनेक वेब सीरिजमध्येही तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतो. वयाच्या या टप्प्यावरही अभयने लग्न केले नाही. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभय अविवाहित आहे.

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.