
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान खानच्या चित्रपटांपासून ते त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बर्याच चर्चा झालेल्या आहेत आणि आताही होतात. सलमानच्या अफेअर्स बद्दल तर तस सर्वांनाच माहीत आहे.
आर्थिक आणि कामासाठी सुरु असलेला स्ट्रगल
पण हे फार कमी जणांना माहित असेल की सलमान जेंव्हा सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आला होता तेंव्हा त्याचा स्ट्रगल सुरू होता तो काम मिळविण्यासाठीही आणि आर्थिक परिस्थितीबाबतीतही. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला खूप मदत केली. याबद्दलचे अनेक किस्से सलमानने त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहेत.
मित्रांनी आणि आपल्या भावंडांनी खूप काही केलं
सलमान खान नेहमी त्याच्या मित्रांचा आणि आपल्या भावंडांचा उल्लेख करताना दिसतो. तसेच सलमान एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करतो तेव्हा तो ती प्रामाणिकपणे टिकवतो. जेव्हा सलमान खानने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. एकदा एका कार्यक्रमादरम्यान, सलमान स्वतः सुनील शेट्टीचा उल्लेख करताना भावनिक झाला होता. त्याने सांगितले होते की, सुनील शेट्टीने सलमानला कठीण काळात खूप मदत केली होती.
सलमान खानने जुन्या आठवणी सांगितल्या
आता, ‘डंब बिर्याणी’ या कार्यक्रमात पुतण्या अरहान खानशी बोलताना, सलमान खानने असे अनेक किस्से सांगितले. त्यातील एक किस्सा म्हणजे , मनालीत तो बहुदा शूटिंगसाठी गेला होता. तेंव्हा त्याला पैशांची प्रचंड गरज होती आणि एका मित्राने त्याला ती मदत केली.
मित्राने लगेच 15000 काढून दिले
अरहान खानशी बोलताना सलमान खानने सांगितले की तो इंडस्ट्रीत नवीन होता. त्याने ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट केला होता. आणि तो ‘सनम बेवफा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या काळात त्याला खरेदीसाठी पैशांची गरज होती.
त्याला काहीतरी हवे होते त्यासाठी त्याला 15 हजार रुपये हवे होते. हे 15 हजार रुपये सलमानला त्याच्या मनाली येथील एका मित्राने लगेच दिले. सलमानने सांगितले की त्या काळात 15000 रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट होती.
सलमान खानने त्याच्या भावांचंही कौतुक केले. तो म्हणाला की, अरबाज, सोहेल आणि अर्पिता आणि तो एकत्र लहानाचे मोठे झाले. त्या सर्वांच्या वयात फारसा फरक नाहीये. पण त्यांच्यात फार strong बॉन्ड असून. अडचणीच्या काळात ते नेहमी एकमेकांच्या सोबत उभे असतात.
सलमानचे मित्रांवर खूप प्रेम
यावेळी सलमानने त्याच्या मित्रांचाही उल्लेख केला. तो म्हणाला की , चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्याचे नॅक्स आणि रॉबिन नावाचे दोन मित्र होते. यानंतर, जेव्हा तो चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा त्याने आणखी मित्र बनवले. यामध्ये साजिद आणि सादिक यांची नावे समाविष्ट होती. त्याचा सिंधिया शाळेत प्रकाश नावाचा एक मित्र होता.
याशिवाय, त्याची जेडी नावाचा चान्गला मित्र आहे. सलमान म्हणाला की हे असे मित्र आहेत ज्यांना वारंवार भेटता येत नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा पूर्वीसारख्याच उत्साहाने भेटतो. तसेच सलमानचा प्रकाश गिरी नावाचा एक कॉलेज मित्र होता. तो त्याला 35 वर्षांनी भेटला पण त्यांचे नाते अजूनही तसेच आहे.
तर अशा पद्धतीने सलमान ज्याच्याशी मैत्री करतो तो कायम निभावतो आणि त्याला मदत केलेल्या व्यक्तिंना तो कधीही विसरत नाही. म्हणून कदाचित सगळे त्याला भाईजान म्हणतात.