सैफची लाडकी लेक करोडपती मॉडेलसोबत रिलेशनमध्ये? अखेर खरं सांगितलंच

अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. सध्या साराचं नाव सुपरमॉडलसोबत जोडलं जात आहे. हा सुपर मॉडेल म्हणजे प्रताप बाजवा.

सैफची लाडकी लेक करोडपती मॉडेलसोबत रिलेशनमध्ये? अखेर खरं सांगितलंच
| Updated on: Jan 24, 2025 | 8:41 AM

स्टारकिड्सच्या चर्चा या आजकाल जास्तच रंगतना दिसतात. त्यात जास्त करून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल,रिलेशनबद्दल गॉसिप आणि बातम्या या समोर येतच असतात. यामध्ये सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खानच्या पलक तिवारीसोबतच्या नात्याबद्दल नेहमीच बातम्या समोर येतच असतात पण आता सैफच्या लाडक्या लेकीच्या डेटींगच्या चर्चाही समोर येऊ लागल्या आहेत.

सारा अली अन् प्रताप बाजवा यांच्या नात्याचं सत्य आलं समोर

अभिनेत्री सारा अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. सध्या साराचं नाव सुपरमॉडलसोबत जोडलं जात आहे. हा सुपर मॉडेल म्हणजे अर्जुन प्रताप बाजवा.

काही दिवसांपूर्वी सारा अली खान करोडपती मॉडेल अर्जुन प्रताप बाजवासोबत केद्रानाथमध्ये दिसली होती. दोघांनी एकत्र पूजाही केली. आणि तेव्हापासून सारा आणि अर्जुन दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एकमेकांना डेट करत आहेत. शिवाय सारा आणि प्रताप यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्जुनने नात्याच्या चर्चांवरील मौन सोडलं

मात्र आता अर्जुनने सारासोबतच्या नात्यावर आपले मौन तोडले आहे. एका मुलाखतीत प्रतापने यावर भाष्य करत म्हटलं हे खरे नाही. मी साधं-सरळ आयुष्य जगणारा माणूस आहे. या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. “लोक त्यांना हवं ते लिहू शकतात. आणि ते लिहित आहेत, पण यावरून बातमी खरी आहे हे सिद्ध होत नाही. हे त्यांचे काम आहे. ते लिहितायत कारण त्यांच्या मनात जे काही येत आहे. मी फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करतो. आणि मला वाटेल ते मी करतो.” असं म्हणतं. त्याने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.

“माझ्याबद्दल कोण लिहितंय याची मला पर्वा नाही”

तसेच तो पुढे म्हणाला ” माझ्याबद्दल कोण लिहितंय याची मला पर्वा नाही. माझे मन मला जे करायला सांगतं ते मी करतो.” असं म्हणत त्याने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. सारा अली खान सध्या वडील सैफची काळजी घेण्यात व्यस्त आहे.


कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?

अर्जुन प्रताप बाजवा एक सुपरमॉडेल आणि अभिनेता आहे. अर्जुन याने रोहित आणि वरुण बलसारख्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. अर्जुन ऑस्कर नामांकित दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या ‘बँड ऑफ महाराजाज’मध्येही दिसला होता. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लिंग सिनेमासाठी त्याने प्रभू देवाला मदत केली होती.

राजकारणाशी अर्जुनचा संबंध

अर्जुन यांने 2022 पर्यंत पंजाबच्या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचा सर्वात तरुण प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं . रिपोर्ट्सनुसार, अर्जुनने लॉरेन्स स्कूल, सनावरमधून राजकारण आणि कृषी विषयात पदवी घेतली आहे. शिवाय अर्जुन जिम्नॅस्ट आणि MMA फायटर देखील आहे.