माजी पंतप्रधानांची नात, बॉलिवूडमध्ये एका रात्रीत झाली स्टार, टॉपची अभिनेत्री होताच कोसळला दुःखाचा डोंगर, 56 व्या वर्षी राहतेय एकटीच

माजी पंतप्रधानांची नात बॉलिवूडमध्ये आली आणि तिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच ती एक रात्रीत स्टार झाली. पण आज अभिनेत्रीकडे सर्वकाही असून देखील वयाच्या 56 व्या वर्षी एकटीच आयुष्य जगत आहे.

माजी पंतप्रधानांची नात, बॉलिवूडमध्ये एका रात्रीत झाली स्टार, टॉपची अभिनेत्री होताच कोसळला दुःखाचा डोंगर, 56 व्या वर्षी राहतेय एकटीच
अभिनेत्री मनिषा कोईराला
| Updated on: Aug 16, 2026 | 9:56 AM

कोणत्या दुसऱ्या देशातून येत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं फार कठीण असतं… पण 1990 आणि 2000 मध्ये हिंदी सिनेविश्वात अशा एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली, जिने बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं. तिचं सौंदर्य, अभिनय आणि डान्स… प्रेक्षकांना इतका आवडला की, अभिनेत्री एका रात्रीत लोकप्रिय झाली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. मनिषाचा जन्म 16 ऑगस्ट 1970 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेला. राजकीय कुटुंबातून असून देखील मनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मनिषाच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, तिचे वडील प्रकाश कोईराला हे माजी कॅबिनेट मंत्री होते आणि तिच्या आईचं नाव सुषमा कोईराला असं आहे. मनीषा कोईराला हिचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान होते. राजकीय कुटुंबातील असून देखील मनिषाने हिंदी सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं.

मनिषा एक अशी अभिनेत्री आहे, जिने फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, नेपाळी, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. अभिनेत्रीने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मनिषा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पहिल्याच सिनेमातून अभिनेत्रीने स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. अनेक हिट सिनेमे अभिनेत्रीने बॉलिवूडला दिले.

पण असं म्हणतात की, सर्वकाही सुरुळीत सुरु असताना कुठेतरी मिठाचा खडा पडतोच. मनिषाच्या आयुष्यात अशी एक वेळ आली, ज्याची अभिनेत्रीने कधी कल्पना देखील केली नसेल. 2012 मध्ये जेव्हा अभिनेत्री बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर होती, तेव्हा तिला चौथ्या टप्प्यातील ओव्हेरियन कॅन्सर असल्याचं निदान झालं; त्यानंतर तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि 2013 पासून ती पूर्णपणे कर्करोगमुक्त आहे.

मनिषा कोईराला हिचं खासगी आयुष्य…

अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2010 मध्ये नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 2 वर्षांनंतर मनिषा आणि सम्राट यांचा घटस्फोट झाला. आज वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच जगत आहे. घटस्फोटानंतर मनिषाने दुसऱ्या लग्नाचा विचार कधीच केला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us