नऊ सेलिब्रिटींचा एकटाच शत्रू होता ‘हा’ मुलगा; प्रचंड स्टारडम कमावूनही कमी वयात गमावले प्राण

या फोटोत दिसणाऱ्या मुलाला ओळखलंत का? टेलिव्हिजन इंडस्ट्रीत त्याने नाव कमावलं, बिग बॉस या शोचं विजेतेपदही पटकावलं. मात्र या अभिनेत्याला कमी वयातच या जगाचा निरोप घ्यावा लागला.

नऊ सेलिब्रिटींचा एकटाच शत्रू होता हा मुलगा; प्रचंड स्टारडम कमावूनही कमी वयात गमावले प्राण
प्रचंड स्टारडम कमावूनही कमी वयात गमावले प्राण
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2023 | 10:17 PM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : शाळेतील शिक्षक आणि इतर मित्रांसोबत गणवेशात दिसणारा हा मुलगा टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. या अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा टीव्ही इंडस्ट्रीत इतका लोकप्रिय झाला की तरुणी त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असायच्या. मात्र करिअर आणि खासगी आयुष्य उत्तम सुरू असतानाही अत्यंत कमी वयात त्याने आपले प्राण गमावले. फोटोतील या मुलाला तुम्ही ओळखलात का?

टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीज प्रसिद्धी मिळवलेला हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून सिद्धार्थ घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याचं अभिनय प्रेक्षकांना खूप आवडलं. त्यानंतर बिग बॉसचा तेराव्या सिझनमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला. या शोदरम्यान त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. लोकप्रियता आणि बिग बॉसच्या घरातील खेळी यांच्या आधारावर सिद्धार्थने विजेतेपद जिंकलं. मात्र बिग बॉसच्याच घरात त्याचे अनेक शत्रूसुद्धा बनले. सिद्धार्थने वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बिग बॉसचा तेराव्या सिजनमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा व्हिडीओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे. एके दिवशी तो बिग बॉसच्या घरातील त्याच्या शत्रूंची गणना करत असतो. “1,2,3,4,5,6,7,8.. तुम्ही सगळे खड्ड्यात जा. मला फरक पडत नाही. मी एकटाच खुश आहे”, असं तो म्हणतो. बिग बॉसच्या घरात झालेल्या शत्रूंमध्ये रश्मी देसाई, असिम रियाज, अरहान खान, हिंदुस्तानी भाऊ, माहिरा शर्मा आणि पारस छाबडा यांचा सहभाग होता.

‘बालिका वधू’ या मालिकेतील शीतल खंडलालने एकेदिवशी सिद्धार्थवर आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये जेव्हा सिद्धार्थ घरात चॅलेंजर म्हणून गेला, तेव्हा एजाज खानसोबत त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं. बालिका वधूमधील आणखी एक अभिनेत्री तोरल रासपुत्रा आणि सिद्धार्थ यांच्यातही कधीच मैत्रीपूर्ण नातं नव्हतं, असंही म्हटलं जातं.