AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान याच्या ‘या’ अभिनेत्रीला गिफ्टमध्ये मिळाली तब्बल 3 कोटींची कार, अभिनेत्रीने खास..

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चित्रपटांना मोठे प्रेम मिळताना दिसतंय. शाहरुख खान हा आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतोय. चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करतो.

शाहरुख खान याच्या 'या' अभिनेत्रीला गिफ्टमध्ये मिळाली तब्बल 3 कोटींची कार, अभिनेत्रीने खास..
| Updated on: Nov 30, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई : अभिनेत्री नयनतारा हिने आपल्या करिअरची सुरूवात साऊथ चित्रपटांमधून केलीये. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये नयनतारा हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या. नयनतारा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नयनतारा ही शाहरूख याच्या जवान चित्रपटामध्ये धमाका करताना दिसली. नुकताच नयनतारा हिचा 39 वा वाढदिवस पार पडलाय. चाहते हे मोठ्या प्रमाणात नयनतारा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. नयनतारा हिला वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट मिळाले. विशेष म्हणजे नयनतारा हिला कोट्यवधी रूपयांचे हे गिफ्ट मिळालंय.

नयनतारा हिने सोशल मीडियावर खास दोन फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त नयनतारा हिला पतीकडून तब्बल 3 कोटीचे गिफ्ट मिळाले. होय तुम्ही खरं ऐकले…नयनतारा हिला पतीने वाढदिवसानिमित्त 3 कोटीचे गिफ्ट दिले. एक अत्यंत खास अशी आलिशान कार नयनतारा हिला गिफ्ट म्हणून देण्यात आलीये.

नयनतारा हिने फोटोमध्ये पूर्ण कार दिसू दिली नाहीये. फक्त कारच्या लोगोचा फोटो शेअर करण्यात आलाय. नयनतारा हिने लिहिले की, घरात तुझे स्वागत आहे सुंदरी…@wikkiofficial माझ्या प्रिय पतीने सर्वात सुंदर भेटवस्तू दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप सारे प्रेम…आता नयनतारा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

नयनतारा हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. नयनतारा हिच्या पतीने जर्मन बेस्ड कार जी मर्सिडीज बेंझ दिलीये. विशेष म्हणजे या कारची किंमत ही 2.70 कोटी ते 3.40 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ही एक अत्यंत लग्झरी अशी कार आहे. ही कार अनेक रंगामध्ये मिळते. मात्र, नयनतारा हिने नेमक्या कोणत्या रंगाची कार घेतली हे कळू शकले नाही.

नयनतारा ही जवान चित्रपटामध्ये धमाका करताना दिसली. जवान चित्रपटामध्ये काम केल्यापासून ती सतत चर्चेत आहे. इतकेच नाही तर चक्क जवान चित्रपटानंतर नयनतारा हिला सतत चित्रपटांच्या आॅफर येत आहेत. जवाननंतर नयनतारा हिच्या फिसमध्ये मोठी वाढ केल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. नयनतारा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना