Big Heart | ‘रेस 3चं’ अपयश विसरून सलमान रेमोच्या मदतीला, पत्नीने मानले आभार!

बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D'Souza) आणि त्याची पत्नी लीझेल (Lizelle D'Souza) यांच्यासाठी हे ख्रिसमस खूप खास आहे

Big Heart | 'रेस 3चं' अपयश विसरून सलमान रेमोच्या मदतीला, पत्नीने मानले आभार!

मुंबई : बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D’Souza) आणि त्याची पत्नी लीझेल (Lizelle D’Souza) यांच्यासाठी हे ख्रिसमस खूप खास आहे, कारण रेमो नुकताच हॉस्पिटलमधून घरी परतला आहे. आता रेमो कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरी करू शकणार आहे. रेमोची पत्नी लीझेल हिने एक खास पोस्ट शेअर केली. तिने तिचा आणि रेमोचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ही ख्रिसमस माझ्यासाठी खूप खास आहे. लीझेलने यावेळी मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. (This Christmas is very special for Remo D’Souza and his wife Liezel)

याशिवाय लीझेल सलमान खानला (Salman Khan) म्हणाली धन्यवाद भाई… मला भावनिक पाठिंबा दिल्याबद्दल, रेस 3 रिलीज झाल्यानंतर सलमान आणि रेमो यांच्यात बराच तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, असे म्हटले जात होते की, हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दोघांमध्ये भांडणे झाली होती. मात्र, याची कधीही पुष्टी सलमान किंवा रेमोने केली नाही. मात्र, रेमोची तब्येत बिघडल्यावर सलमानने लीझेलला भावनिक पाठिंबा दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

रेमो डिसूझाला 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यावर सर्वच जण चकित झाले होते. रेमोच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या विषयी माहिती कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते.

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर त्यांनी दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते.

संबंधित बातम्या : 

अन्नाथेच्या सेटवरील 8 जणांना कोरोना, आता स्वत: रजनीकांत रुग्णालयात दाखल

कोरोना वादावर कनिका कपूरचे मोठे विधान, मला आणि माझ्या मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या!

(This Christmas is very special for Remo D’Souza and his wife Liezel)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI