
बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे अनेक चेहरे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. त्यांचे व्हायरल फोटोही दाखवले आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत.

अक्षय सारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव माजिद मीर आहे. माजिद मीर जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचे रहिवासी आहेत. काही काळापूर्वी यांचे फोटो समोर आले होते. एका वाहिनीच्या सहयोगी संपादकानं अक्षय सारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

माजिद हे क्रिकेटर सुनील गावस्कर यांचे चाहता आहेत. ते रोज त्यांच्यासारखी टोपी घालतात.

अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी करतोय. तो लवकरच अयोध्येत ‘राम सेतु’ चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे.

काही काळापूर्वी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.