
जितेंद्र हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. आता जितेंद्र यांचे नशीब एका रात्रीत बदललं आहे आणि त्याने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. वयाच्या 83 व्या वर्षी जितेंद्र कपूर यांनी 855 कोटी रुपये कमावले आहेत. एका रात्रीत अशी एक डील यशस्वी झाली आहे की, चक्क एवढं घबाड मिळालं आहे. चला जाणून घेऊयात.
जितेंद्र कपूर यांनी कितीला विकली जमीन?
तर, जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील अंधेरी येथील त्यांची एक जमीन 855 कोटी रुपयांना विकली आहे. ही जमीन जपानी कंपनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सला विकण्यात आली. हा करार जितेंद्रच्या कुटुंबातील दोन कंपन्यां, पँथियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून करण्यात आला. हा करार 29 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला आणि त्यात 9, 664.68 चौरस मीटर (सुमारे 2.39 एकर) दोन शेजारील जमिनींचा समावेश आहे. या जमिनीवर सध्या बालाजी आयटी पार्क आहे, ज्यामध्ये तीन इमारती आहेत आणि एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे 4.9 लाख चौरस फूट आहे.
जितेंद्र कपूर यांनी कोणाला विकली जमीन?
पूर्वी नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने ही जमीन खरेदी केली आहे. कंपनी क्लाउड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट यासारख्या तंत्रज्ञान सेवा पुरवते. या करारासाठी 8.69 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000रुपये नोंदणी शुल्क आकारले गेल्याचं म्हटलं जात आहे.
अंधेरी आता एक प्रमुख व्यावसायिक आणि निवासी केंद्र बनले
प्रमुख व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रांमधील अंधेरी आता एक प्रमुख व्यावसायिक आणि निवासी केंद्र बनले आहे. अलीकडेच, बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत आणि त्यांची पत्नी ज्योती हुडा यांनी अंधेरी वेस्टमध्ये 10 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले, ज्याचा कार्पेट एरिया 1, 950 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 2,341 चौरस फूट आहे.
अनेक कलाकारांनी घेतली घरं
तसेच, एप्रिलमध्ये, बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक आणि त्यांची मुलगी सायेशा कपूर यांनी अंधेरी पश्चिमेतील ओबेरॉय स्काय हाइट्समध्ये 2, 297 चौरस फूट क्षेत्रफळाचा एक आलिशान अपार्टमेंट 11.5 कोटी रुपयांना खरेदी केला. यापूर्वी, बॉलिवूड संगीतकार आणि गायक अनु मलिक आणि त्यांची पत्नी अंजू मलिक यांनी सांताक्रूझ पश्चिमेतील दोन अपार्टमेंट14.49 कोटी रुपयांना विकले. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी अंधेरी पश्चिमेतील 8,429 चौरस फूट क्षेत्रफळाच्या तीन व्यावसायिक मालमत्ता 60 कोटी रुपयांना खरेदी केल्या.