
कन्नड सुपरस्टर यश हा 'केजीएफ 2' चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अशातच आता त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर गुरुवारी रिलीज झाला.

या चित्रपटात त्याचा दमदार अभिनय पाहून चाहत्यांना देखील आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. त्याचा हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.

त्यामुळे हा टीझर रिलीज होताच या चित्रपटासाठी यशने किती फी घेतली याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी अभिनेता यशने 50 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे.

यशच्या या चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी रुपये इतके आहे. या चित्रपटासाठी कियारा आडवाणीने 15 कोटी रुपये इतकी फी घेतली. जी तिच्या पहिल्या चित्रपटांपेक्षा खूप जास्त आहे.

तर नयनताराने या चित्रपटासाठी 12 ते 18 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे. रुक्मिणी वसंत मेलिसाने 3 ते 5 कोटी रुपये इतकी फी घेतली. हुमा कुरैशी आणि तारा सुतारियाने 2 ते 3 कोटी रुपये फी घेतलीय.