TVK CM Vijay -Trisha : डोळे भरुन आले, भावनांना कसं बसं..विजयच्या शपथविधी वेळचा त्रिशाचा VIDEO व्हायरल

TVK CM Vijay -Trisha : मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या संबोधनात विजयने तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. आपलं शासन एका नव्या युगाची सुरुवात असेल असं विजय म्हणाला. विजयचे फॅन्स सतत त्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

TVK CM Vijay -Trisha : डोळे भरुन आले, भावनांना कसं बसं..विजयच्या शपथविधी वेळचा त्रिशाचा VIDEO व्हायरल
Tirsha-Vijay
Image Credit source: social media
| Updated on: May 11, 2026 | 8:44 AM

मागच्या आठवड्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यात तामिळनाडूचा निकाल सर्वात वैशिष्ट्य पूर्ण ठरला. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून आलटून-पालटून सत्तेचा खेळ सुरु होता. तामिळनाडूच्या जनतेने या खेळाला पूर्णविराम दिला. त्यांनी TVK या नव्या पक्षाला सत्तेच्या जवळ पोहोचवलं. TVK हा अभिनेता थलपती विजयचा पक्ष आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी हा पक्ष स्थापन करण्यात आला. TVK ने सर्वाधिक 107 जागा जिंकल्या. बुहमतासाठी त्यांना अजून 11 जागांची आवश्यकता होती. काँग्रेस, सीपीआय आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने विजयने बहुमताचा आकडा गाठला. काल तामिळनाडूच्या नेहरु स्टेडियममध्ये थलपती विजयचा शपथविधी झाला. त्यावेळी जोसेफ विजयने तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमाला विजयच्या कुटुंबासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन सुद्धा उपस्थित होती.

विजय आणि त्रिशामध्ये अफेअर असल्याचं बोललं जातं. दोघे लवकरच लग्न करतील अशीही चर्चा आहे. या शपथविधी सोहळ्यात त्रिशाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. निळ्या रंगाची साडी, केसांमध्ये माळलेला गजरा, सोज्वळ चेहरा आणि त्यावर स्मित हास्य त्रिशाचं हे सौदर्य, लूक खिळवून ठेवणारा होता. सहाजिकच कॅमेऱ्याची नजर त्रिशावर होती. सोशल मीडियावर त्रिशा आणि विजयचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात एका व्हिडिओमध्ये विजय शपथ घेत असाताना त्रिशा भावनिक झाल्याचं दिसत होतं.

त्रिशा पूर्ण भावनिक झालेली

विजयच्या अनेक फॅन्सनी हा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. या व्हिडिओत विजयचं भाषच चालू असताना त्रिशाचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. सहाजिक हे आनंदाश्रू आहेत. कारण विजयची राजकारणातील एन्ट्री, त्याने मिळवलेलं यश देखील तितकचं मोठं आहे. त्रिशा पूर्ण भावनिक झाली होती. पण त्या स्थितीतही तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत होती.

त्रिशाने काय उत्तर दिलं?

त्रिशा विजयच्या शपथविधी सोहळ्यासाठी तामिळनाडूच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आली. त्यावेळी एका मीडियाच्या माणसाने त्रिशाकडे पाहून तामिळनाडूसाठी हा मोठा दिवस आहे असं म्हटलं. त्यावर तिने सुद्धा हसून ‘हो, धन्यवाद, मी सुद्धा आतुरतेने या क्षणाची वाट पाहत आहे’ असं उत्तर दिलं. त्रिशाची आई उमा कृष्णनही तिच्यासोबत होती.

Follow Us