Tusshar Kapoor : लग्न न करता झाला बाप, वयाच्या 49व्या वर्षी जगतोय सिंगल आयुष्य; का नाही केलं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यानं लग्न?

Bollywood Actor : बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं अद्याप लग्न केलं नसून त्याला एक मुलगा आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या.

| Updated on: Nov 20, 2026 | 3:27 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अविवाहित अभिनेते असून त्यांना अनेकदा त्यांच्या लग्नाच्या योजनांबद्दल विचारलं जातंच. तुषार कपूर या अविवाहित अभिनेत्यांपैकी एक आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अविवाहित अभिनेते असून त्यांना अनेकदा त्यांच्या लग्नाच्या योजनांबद्दल विचारलं जातंच. तुषार कपूर या अविवाहित अभिनेत्यांपैकी एक आहे.

2 / 5

तुषार कपूरनं 'गोलमाल'सह अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अडीच दशकांच्या कारकिर्दीत तुषारनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्याकडे कशाचीही कमतरता नाही. तरीही तुषार वयाच्या 49व्या वर्षी सिंगल आहे.

3 / 5

तुषारनं अद्याप लग्न केलेले नाही आणि लग्न करण्याची त्याची कोणतीही योजना नाही. अभिनेत्यानं स्वतःच सांगितलं आहे की, त्याला लग्न करायचं नाही. त्याला वडील व्हायचं होतं, म्हणून तो 2016 मध्ये सरोगसीद्वारे वडील झाला. त्याला एक मुलगा आहे आणि अभिनेता एकटा सरोगेट वडील आहे.

4 / 5

एका जुन्या मुलाखतीत तुषार कपूर म्हणाला, 'आपल्या समाजात, एखादी व्यक्ती 20-25 वर्षांची झाली की लग्न करण्याचा दबाव सुरू होतो. 30 वर्षांनंतर हा दबाव आणखी वाढतो. यामध्ये सामाजिक आणि कौटुंबिक दबावाचा समावेश असतो. मात्र, माझा विश्वास आहे की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. एखाद्या व्यक्तीनं तेव्हाच लग्न करावं, जेव्हा ती त्यासाठी खऱ्या अर्थाने तयार असेल.'

5 / 5

'माझ्या मते, लग्न प्रत्येकासाठी नसतं. माझा लग्नाच्या परंपरेवर विश्वास आहे, पण ती प्रत्येकासाठी बनलेली नाही. त्यावेळी मला वाटलं की, मला वडील व्हायचं आहे. मी या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार होतो आणि मला खात्री होती की, मी एक चांगला वडील होऊ शकेन, म्हणून मी झालो.' असं तुषार कपूर म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us