सोन्याची दुकाने नाही, इथे मिळते सर्वाधिक स्वस्त सोने, 99 टक्के लोकांना माहितीच नाही ठिकाण..
सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव कोसळत आहे. पुढील काही दिवसात सोने अजून खाली जाईल, असा अंदाज आहे. सोने एक लाखाच्याही खाली येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यातच सोने कुठे स्वस्त मिळते, हे जाणून घ्या.

सोन्याचे भाव धाड.. धाड… कोसळले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावाची घसरण अजिबात थांबत नाहीये. सोने निचांक गाठताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचा भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. आता तो 1 लाख 19 हजारांच्या आसपास पोहोचला आहे. सोन्याच्या भावात थेट घसरण होत आहे. पण तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल की, सोन्याच्या दुकानांपेक्षाही स्वस्त सोने दुसऱ्या एका मिळते. सोन्याचे व्यापारी मेकिंग चार्ज आणि इतर शुल्क आपल्याला लावतात. ज्यामुळे आपल्याला अधिकचे पैसे मोजावी लागतात. पण हे शुल्क वाचवायचे असेल तर दुसराही महत्वाचा मार्ग आपल्याकडे आहे. गोल्डन ऑप्शनमध्ये तुम्ही सोने खरेदी केली तर तुमच्या पैशांची मोठी बचत होईल. बँक आणि नॉन बँकिंग फायनेंशियल कंपन्या या गोल्ड लोनच्या बदल्यात गहान ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करतात.
ज्यावेळी कर्जाची परतफेड होत नाही आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होते, त्यावेळी सोन्याचा भावाचा लिलाव होतो. या लिलावात खरेदीदार बोली लावून सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या किंमती या लोन रक्कमेनुसार ठरतात. इथे आपण बोली लावून सोन्याची खरेदी करू शकता. अगदी पैशांची मोठी बचत होते आणि सोनेही कमी किंमतीमध्ये मिळते.
पैशांसाठी लोक बँकमध्ये सोने गहान ठेवतात पण हप्ते भरले नाही, त्यानंतर प्रक्रिया करून त्या सोन्याचा लिलाव होतो. गोल्ड ऑप्शनमध्ये सोने स्वस्त मिळते. सोन्याच्या एखाद्या लिलावात खरेदीदार कमी असतील तर सोन्याचा साैदा स्वतात होतो. मात्र, जास्त खरेदीदार असतील तर ते भाव पुढे जाऊ शकतात. जर खरेदीदार कमी असतील तर तुम्हाला अधिक कमी पैशात सोने मिळेल.
आरबीआयच्या नियमांनुसार कर्जदात्यांकडून सोने आणि चांदीच्या लिलावासाठी रिझर्व्ह प्राईसप्रचलित बाजारमूल्याच्या किमान 90 टक्के इतकी निश्चित करणं गरजेचे असते. जर समजा दोनवेळा लिलाव फेल झाला तर काही अटींचे पालक करून त्याची मर्यादा कमी करून 85 टक्के केली जाते. पण कायमच खरेदीदारांना हे सोने 10 ते 15 टक्क्यांनी स्वस्त मिळते.
