Video : कामवाल्याबाईने चिकनसोबत शिजवलं प्लास्टिक! एक छोटी चूक ठरू शकली असती मालकासाठी धोकादायक
सोशल मीडियावर घरमालकाने त्याच्या कामवाल्या बाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या कामवाल्या बाईने असं काही केलं आहे की नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घरात स्वयंपाकासाठी मदतनीस ठेवली की रोजच्या कामाचा बराच ताण कमी होतो. पण कधी कधी त्यांच्या हातून काही चुकाही होतात. पण या कामवाल्या बाईने असं काही केलंय,ज्यामुळे ते तिच्या मालकाच्या जीवावरही बेतलं असतं. अनेकांनी त्या कामवाल्या बाईवर संताप व्यक्त केला आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असं तिने काय केलंय जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका भांड्यात चिकनची करी शिजताना दिसत आहे. सुरूवातीला पाहिल्यावर सगळं अगदी सामान्य वाटतं. मात्र शिजताना नीट पाहिलं तर चिकन प्लॉस्टिकच्या पॅकेटमध्येच असल्याचं लक्षात येतं. म्हणजे फ्रिजमधून फ्रोजन चिकनचं पाकिट काढलं आणि ते पाकीट खोलून चिकन बाहेर काढण्याऐवजी त्या कामवाल्या बाईने तसेच चिकन टाकून भांड्यात टाकून शिजवले आहे.
हा व्हिडिओ सौरव देवरानी नावाच्या व्यक्तीने इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. त्याने सांगितलं की, घरात नेहमी फ्रोजन चिकन ठेवलं जातं. त्याने मेडला जेवण बनवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र चिकन पाकिटातून बाहेर काढून शिजवायचं असतं हे सांगायचं राहून गेलं. त्याने त्या कामावाल्या बाईने त्या प्लॉस्टिकच्या पाकीटासोबतच शिजवलं. या प्रकारानंतर घरमालकही चांगलाच गोंधळला. व्हिडिओ शेअर करताना त्याने मजेशीरपणे कामवाल्या बाईला नोकरीवरून काढून टाकावं का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला.
Wtaf , His Maid cook the Frozen Chicken. With packet😭😭 https://t.co/ByqoMCq5jQ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 19, 2026
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
एका यूजरने कामवाल्या बाईची इंटर्नशिप असावी, अशी टिप्पणी केली. तर दुसऱ्याने आता तरी दीदींचे पाय पकडायला हवे असं मत व्यक्त केलं. काहींनी या प्रकारावर हसण्याऐवजी गंभीर प्रकार आहे असं म्हटलं आहे. पण खरचं जर मालकाचं लक्ष गेलं नसतं आणि त्या महिलेने ते चिकन नाही तर त्या चिकनचा रसा तरी मालकाला खायला दिला असता तर ते मालकाच्या जीवावर बेतले असते.
व्हिडिओ पाहून हसू येतं असलं तरी, प्लॉस्टिकच्या पॅकेटसह चिकन शिजवणं ही गंभीर बाब आहे. प्रत्येक प्लॉस्टिक पॅकेट उच्च तापमानात अन्न शिजवण्यासाठी बनवलेलं नसतं. त्यामुळे गरम करताना त्यातून अन्नात अवांछित रसायने मिसळण्याचा धोका असू शकतो. म्हणूनच फ्रोजन चिकन वापरण्यापूर्वी ते पॅकेटमधून बाहेर काढून. सुरक्षित पद्धतीने वितळवून आणि योग्य तापमानावर शिजवणं आवश्यक आहे.
