Ankita Lokhande Father Death | अंकिता लोखंडेने पार पाडले मुलाचे कर्तव्य, वडिलांना दिला खांदा, पाहा व्हिडीओ

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे तिने काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अंकिता लोखंडे हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

Ankita Lokhande Father Death | अंकिता लोखंडेने पार पाडले मुलाचे कर्तव्य, वडिलांना दिला खांदा, पाहा व्हिडीओ
Ankita Lokhande
| Updated on: Aug 13, 2023 | 5:44 PM

मुंबई : अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या वडिलांचे काल निधन झाले. मुंबईमध्ये अंकिता लोखंडेच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. अंकिता लोखंडे ही वडिलांच्या अत्यंत जवळ होती. सोशल मीडियावर कायमच आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना अंकिता लोखंडे ही दिसत होती. मात्र, वडिलांच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने अंकिता लोखंडे हिला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे.

एकता कपूरच्या मालिकेत अंकिता लोखंडे ही महत्वाच्या भूमिकेत होती आणि तिला खरी ओळख ही पवित्र रिश्ता मालिकेतूनच मिळालीये. अंकिता लोखंडे हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. 12 आॅगस्टला अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्युचे कारण कळू शकले नाहीये.

आज अंकिता लोखंडे हिच्या वडिलांवर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंकिता लोखंडे ही मुलाचे कर्तव्य पार पाडताना दिसली. यावेळी अंकिता लोखंडे हिने आपल्या वडिलांना खांदा दिल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा देखील तिच्यासोबतच होता.

वडिलांच्या अंत्यसंस्कार वेळी अंकिता लोखंडे रडताना दिसली. पती विकी जैन याच्या खांद्यावर डोके ठेवून अंकिता रडताना दिसली. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी टीव्हीतील अनेक कलाकार पोहचले होते. आरती सिंह ही अंकिता लोखंडे हिची चांगली मैत्रिण असून ती यावेळी उपस्थित होती.

अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात पवित्र रिश्ता मालिकेच्या माध्यमातून केली. विशेष म्हणजे या मालिकेमुळेच अंकिता प्रत्येक घरी पोहचली. ही मालिका अत्यंत हिट ठरली. फक्त मालिकाच नाही तर अंकिता लोखंडे हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

अंकिता लोखंडे ही लग्नानंतर आता पती विकी जैन याच्यासोबत मुंबईमध्येच राहते. विकी जैन हा एक व्यावसायिक आहे. कोट्यावधी संपत्तीची मालकीन आज अंकिता लोखंडे आहे. मुंबईतील अत्यंत महागड्या परिसरात अंकिता लोखंडे हिचे घर असून त्याची किंमत कोट्यावधी आहे. अंकिता लोखंडे हिने आपले घर खास डिझाईन केले आहे.