कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली..

Dipika Kakar Instagram Story : दीपिका कक्करची तब्येत आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. तिने सोशल मीडियावर एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली असून सध्या ती प्रचंड व्हायरल होत आहे.

कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली..
सर्जरीनंतर दीपिकाने केली पहिली पोस्ट
Image Credit source: social media
| Updated on: Jun 12, 2025 | 12:00 PM

Dipika Kakar Instagram Story : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या आयुष्यात सध्या एक अतिशय कठीण टप्पा आलेला आहे. तिला लिव्हर कॅन्सर झाल्याचे निदान काही दिवसांपूर्वीच झाले होते. दीपिका आणि तिचा पती शोएब यांनी सोशल मीडियावरच एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली होती. स्टेज 2 कॅन्सरचे निदान झाल्यावर नुकतीच दीपिकावर सर्जरी करण्यात आली, जे सुमारे 14 तास चाललं. ऑपरेशननंतर दीपिका आत रिकव्हर होत आहे.

याच पार्श्वभूमीवर दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएबने एक व्लॉग शेअर करून सर्जरीनंतर दीपिकाची एक झलक दाखवली होती. ज्यामध्ये तिला पट्टी बांधलेली दिसत होते आणि दीपिकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. आता सर्जरीनंतर दीपिकाते सोशल मीडियावर तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर अतिशय वेगाने व्हायरल होत आहे.

दीपिकाने शेअर केली पोस्ट

दीपिका कक्करने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पॉझिटिव्ह कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने अल्लाहबद्दल लिहिले आहे. दीपिकाने लिहिलं – अल्लाह पाहतोय, अल्लाह जाणतो आणि अल्लाह सर्व काही ठीक करेल. यासोबतच दीपिकाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला.

सर्जरीनंतर कशी आहे स्थिती ?

काही दिवसांपूर्वी दीपिकावरील 14 तासांच्या सर्जरीनंतर शोएबने जो ब्लॉग शएर केला, त्यात त्याने तिच्या तब्येतीबद्दल अपडेट्स दिले होते. ती आता आधीपेक्षा बरी आहे, थोडंफार खाऊ शकत्ये असं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने व्लॉगमध्ये चाहत्यांशी दीपिकाची भेट करून दिली. तेव्हा दीपिका रडू लागली. ती म्हणते- माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही, असं तिने सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर मी जास्त भावनिक झालो आहे. मी छोट्या छोट्या गोष्टींवर रडू लागते, असंही ती म्हणाली.

रुहानची घेतली भेट

शोएब आणि दीपिकाची आई त्यांना भेटायला आली, हेही त्यात दाखवलं. त्यांचा मुलगा रुहानही त्यांच्यासोबत आला होता. रुहानला पाहून दीपिका आनंदी झाली आणि तिच्या मुलासोबत खेळू लागली. आईला पाहून रुहानही खूप आनंदी झाला. तो लगेच तिच्याकडे झेपावला. आणि हातवारे करून तिला अनेक गोष्टी सांगू लागल्या. रुहानला पाहून दीपिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आलं. तब्बस 14 तासांच्या सर्जरीनंतर आता दीपिकाला चालताना, बोलताना पाहून चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

‘ससुराल सिमर का’ आणि ‘बिग बॉस 12’ सारख्या सुपरहिट टीव्ही शोसाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाला गेल्या महिन्यात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. त्यापूर्वी ती सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्येही झळकली होती. दीपिकाने स्वतः इंस्टाग्रामवर माहिती दिली होती. तिच्या आजाराबद्दल कळताच लाखा चाहत्यांनी कमेंट्स करत तिला धीर दिला, तिला लवकर बरं वाटावं म्हणून अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली.