दुसऱ्या धर्माच्या अभिनेत्याच्या प्रेमात अभिनेत्री, अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये तरीही करत नाहीये लग्न, म्हणाली, जेंव्हा..

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जास्मिन भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जास्मिन भसीन ही अली गोनी याला डेट करत आहे. अनेक वर्षांपासून हे रिलेशनशिपमध्ये आहे. आता लग्नाबद्दल जास्मिनने मोठा खुलासा केलाय.

दुसऱ्या धर्माच्या अभिनेत्याच्या प्रेमात अभिनेत्री, अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये तरीही करत नाहीये लग्न, म्हणाली, जेंव्हा..
Jasmin Bhasin and Aly Goni
| Updated on: Jun 08, 2024 | 5:23 PM

जास्मिन भसीन सध्या तिच्या अभिनयापेक्षाही अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जास्मिन भसीन हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हेच नाही तर बिग बॉसमध्ये देखील धमाका करताना जास्मिन भसीन दिसलीये. जास्मिन भसीन ही टीव्ही अभिनेता अली गोनी याला डेट करत आहे. दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जास्मिन भसीन आणि अली गोनी यांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. जास्मिन भसीन आणि अली गोनी सोशल मीडियावर कायमच एकमेकांचे फोटो खास फोटोही शेअर करताना दिसतात.

जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या लग्नाची चाहते वाट पाहत आहेत. सातत्याने यांना लग्न कधी करणार हा प्रश्न देखील विचारला जातो. नुकताच याबद्दल बोलताना आता जास्मिन भसीन ही दिसलीये. जास्मिन भसीन हिने एक मुलाखत दिलीये. पहिल्यांदाच आपल्या आणि अली गोनीच्या लग्नाबद्दल बोलताना जास्मिन भसीन दिसली.

जास्मिन भसीन म्हणाली की, आता ते दिवस गेले की, महिला लग्न होऊन सेटल व्हायच्या. आताच्या काळात प्रत्येक महिला आपल्या पायावर उभी आहे. आता महिला सुरक्षेसाठी लग्न नाही करत तर जोडीदाराची साथ मिळावी यासाठी लग्न करतात. लग्नाबद्दल तर मी हेच म्हणून शकते की, त्याबद्दल आम्हाला आताच काही माहिती नाहीये.

ज्या पद्धतीची मी आहे, त्यानुसार मी समाजाच्या प्रेशरखाली नाही जगत. मी माझ्या मर्जीने आयुष्य जगते आणि अली देखील तसाच आहे. मुळात म्हणजे अली देखील आपले कुटुंब सोडून मुंबईमध्ये एखादी मुलगी शोधून लग्न करण्यासाठी आला नाहीये. मी देखील माझे कुटुंब सोडून लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी मुंबईमध्ये आले नाहीये.

आम्ही दोघेपण मुंबईमध्ये आपआपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. यासाठी आम्ही खूप जास्त मेहनत देखील घेतलीये. आमच्यासाठी सर्वात पहिले आमचे स्वप्न येतात. ज्यादिवशी आम्हाला दोघांना वाटेल की, आमची सर्व स्वप्न आता पूर्ण झाली आहेत, त्यादिवशी आम्ही लग्नाचा विचार करणार. आता लग्नाबद्दल स्पष्ट बोलताना जास्मिन भसीन दिसली आहे.