सर्वच थक्क! खुशी मुखर्जीचा नवीन लुक पाहून चाहत्यांनी व्यक्त केला संताप, व्हिडीओ पाहून तुम्ही…

खुशी मुखर्जी सध्या तिच्या बोल्ड आणि हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल झाल आहे.

सर्वच थक्क! खुशी मुखर्जीचा नवीन लुक पाहून चाहत्यांनी व्यक्त केला संताप, व्हिडीओ पाहून तुम्ही...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 20, 2026 | 6:47 PM

Khushi Mukherjee Video : टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जी ही रिअॅलिटी शो आणि फॅन्टसी-ॲक्शन मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र, गेल्या काही काळात ती तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड स्टाइल आणि वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत राहिली आहे. नुकताच तिचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओमध्ये खुशी मुखर्जी काळ्या रंगाच्या अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये कारमधून उतरताना दिसत आहे. तिने परिधान केलेल्या ड्रेसची रचना अत्यंत बोल्ड असल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.

कमेंट्सचा पाऊस

या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. काहींनी अभिनेत्रीवर टीका करत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या पोशाखांवर कारवाई व्हायला हवी असे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी समाजातील नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, काही चाहत्यांनी तिच्या फॅशन निवडीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग मानत समर्थनही दर्शवले आहे.

कोलकाता येथे जन्मलेल्या खुशी मुखर्जी ही अभिनेत्री, मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. तिने MTV Splitsvilla 10, Love School 3 आणि Baalveer Returns यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.

याशिवाय तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही काम केले असून Heart Attack आणि Donga Prema यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. काही वेब सिरीजमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.

सोशल मीडियावर कायम चर्चेत

खुशी मुखर्जी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती तिच्या बोल्ड फॅशनमुळे ती वारंवार चर्चेत येत असते. तिच्या या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा फॅशन, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक मर्यादा यांवर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिकृतरीत्या कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद रंगला आहे. तिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे.