गळ्यात चक्क साप ! कॅमेऱ्यासमोर दिल्या पोझ; साराचा अनोखा VIDEO व्हायरल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अरफीन खान नुकतीच स्पॉट झाली. यावेळी तिच्या गळ्यात चक्क जिवंत साप होता ! सापाला गळ्यात घेऊनही ती बिनधास्तपणे पोझ देत होती. तिचा हा बेधडक अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गळ्यात चक्क साप ! कॅमेऱ्यासमोर दिल्या पोझ; साराचा अनोखा VIDEO व्हायरल
| Updated on: Sep 29, 2026 | 7:30 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अरफीन खान ही तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ‘जमाई राजा ‘ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या साराचं नाव घराघरांत पोहोचलं. तसंच तिने कतरिना कैफ आणि इम्रान खान यांच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटातही काम केलं होतं. . सारा ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. लग्नानंतर ती काही काळ परदेशात स्थायिक झाली होती. मात्र नुकतीच ती मुंबईत स्पॉट झाली. पापाराझींसमोर तिने हसत, बिनधास्त अंदाजात पोझही दिल्या. मात्र त्यावेळी तिचा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण यावेळी तिच्या गळ्यात होता चक्क साप !

भीती बीती काय नाही…

Loading...

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, अभिनेत्री सारा अफरीन खान हिचा सध्या समोर आलेला व्हिडिओ काहीसा वेगळाच आहे. या व्हिडिओमध्ये सारा चक्क एका मोठ्या सापाला गळ्याजवळ घेऊन दिसली. हो, हे खरं आहे. साराच्या गळ्यात चक्क साप होता, आणि तसं असूनही ती बिनधास्त होती. अभिनेत्री सारा अफरीन खानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये सारा चक्क गळ्यात साप घेऊन दिसली. गळ्यात साप गुंडाळूनही तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं.

 

नेटकरी थक्क

साप तिच्या खांद्याजवळ आणि गळ्याभोवती असतानाही सारा अगदी सहजपणे कॅमेऱ्याकडे पाहत होती. कधी ती सापाकडे पाहत होती तर कधी बसून तिने कॅमेऱ्याला पोझ दिल्या. एवढंच नव्हे तर एकदा तिने त्या सापाला किसही केलं. तिचा हा बिनधास्त अंदाज असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं असून नेटकरी देखील थक्क झाले. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. अनेक जण तिचा हा अवतार पाहू थक्क झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us