मागे देव, समोर दारू आणि नॉन-व्हेज; उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी

गायक अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा जय भट्टाचार्य याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये उदित नारायण, राजेश रोशन, जतिन पंडित दिसत आहेत. या व्हिडीओवरून त्यांना ट्रोल केलं जातंय.

मागे देव, समोर दारू आणि नॉन-व्हेज; उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2026 | 2:49 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक उदित नारायण हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची पहिली पत्नी रंजनाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. उदित नारायण हे नुकतेच इंडस्ट्रीतील काही दिग्गज गायकांसोबत सेलिब्रेशन करत होते. परंतु याच सेलिब्रेशनच्या व्हिडीओवर नेटकरी नाराज झाले आहेत. कारण हे सर्व गायक गणपतीच्या फोटोसमोर बसून मद्यपान करताना दिसत आहेत.

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा जय भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व सेलिब्रिटी जल्लोष करत असल्याचं त्याने सांगितलं. या व्हिडीओमध्ये अभिजीत भट्टाचार्य यांच्यासोबत राजेश रोशन, उदित नारायण आणि संगीतकार जतिन पंडित दिसत आहेत. हे सर्वजण मिळून ‘पहला नशा, पहला खुमार’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत. जिथे अभिजीत उभे आहेत, तिथेच उदित नारायण आणि जतिन बसून गाण्यात धुंद झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्यासमोरील टेबलावर ड्रिंक्स ठेवले होते आणि त्याच्या मागील भिंतीवर गणपती बाप्पाचा फोटो लावला होता.

Loading...

या एकंदर माहौलवर आता नेटकरी कमेंट्स करत आहेत. ‘मागे देव, समोर दारू.. वाह’ अशी उपरोधिक कमेंट एकाने केली. तर ‘देवाच्या फोटोसमोरच दारूची पार्टी सुरू आहे. तुम्ही अशा पद्धतीने आपल्या धर्माचा आदर करता का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘वाढदिवस साजरा केला जातोय, चांगली गोष्ट आहे. पण मागे देवाचा फोटो आहे, ते तरी पहा. देव सगळं बघतोय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

उदित नारायण हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची पहिली पत्नी रंजना, जिच्याशी त्यांनी 7 डिसेंबर 1984 मध्ये लग्न केलं होतं, तिने आरोप केले होते की उदित नारायण यांनी त्यांची दुसरी पत्नी दीपा नारायणसोबत मिळून त्यांच्या नकळत गर्भाशय काढला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us