Udit Narayan: उदित नारायण यांना हार्ट अटॅक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

उदित नारायण यांची प्रकृती गंभीर असल्याचा पोस्ट व्हायरल; मॅनेजरने सांगितलं सत्य

Udit Narayan: उदित नारायण यांना हार्ट अटॅक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Udit NarayanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 12:57 PM

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे पोस्ट व्हायरल होत आहेत. उदित नारायण यांना हार्ट अटॅक (Heart Attack) आला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. ही पोस्ट वाचून चाहते चिंतेत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर इंडस्ट्रीतील (Bollywood Industry) कलाकारसुद्धा उदित नारायण यांच्या प्रकृतीविषयी चिंतेत आहेत. मात्र या सर्व चर्चांमागील नेमकं सत्य काय आहे, हे जाणून घेऊयात..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमागील सत्य वेगळंच आहे. उदित नारायण यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण या सर्व फक्त अफवा आहेत. उदित नारायण यांची प्रकृती ठीक आहे आणि ते एकदम फिट आहेत. त्यांना हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या नाही.

सोशल मीडियावर ज्या वेगाने या अफवा पसरत आहेत, ते पाहून अखेर त्यांच्या मॅनेजरने समोर येत स्पष्ट केलं आहे. उदित नारायण यांच्या हार्ट अटॅकविषयी केवळ अफवा असून त्यात काहीच तथ्य नसल्याचं मॅनेजरने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती एकदम ठीक असल्याची माहितीही मॅनेजरने दिली.

हे सुद्धा वाचा

“या अफवा कशामुळे सोशल मीडियावर पसरत आहेत, माहीत नाही. मलासुद्धा सतत फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत. ट्विटरवरील पोस्ट पाहिल्यानंतर मी काल रात्री उदित नारायण यांच्याशीसुद्धा बोललो. तेसुद्धा खूप चिंतेत होते”, असं मॅनेजर म्हणाला.

उदित नारायण यांच्या मॅनेजरच्या मते नेपाळवरून ही अफवा पसरली आहे. ज्या नंबरवरून त्यांच्या प्रकृतीविषयी मेसेज केला गेला, तो नंबर नेपाळचा आहे. ही अफवा का आणि कशासाठी पसरवली गेली ते अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.