LOVE LIFE | वयाच्या ३८ व्या वर्षी देखील ‘ही’ अभिनेत्री एकटीच, असं काय झालं ज्यामुळे तिला वाटते लग्नाची भीती

| Updated on: Oct 09, 2023 | 7:34 PM

LOVE LIFE | अभिनेत्री बॉलिवूडवर करते राज्य, तिला का वटते लग्नाची भीती? कारण जाणून व्हाल हौराण... सिनेमे, वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका सकारत अभिनेत्रीने केलं चाहत्यांच्या मनावर राज्य, चाहत्यांची संख्या फार मोठी, पण वयाच्या ३८ व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच...

LOVE LIFE | वयाच्या ३८ व्या वर्षी देखील ही अभिनेत्री एकटीच, असं काय झालं ज्यामुळे तिला वाटते लग्नाची भीती
Follow us on

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : प्रेम, रिलेशनशिप, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट… इत्यादी खासगी गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. पण झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच नाही. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींच्या आयुष्यात रिलेशनशिपमुळे दुःख आणि एकटेपणा आला. ज्यामुळे अभिनेत्रींना आलेल्या प्रसंगावर मात करणं फार कठीण झालं. पण काही अभिनेत्रींच्या आयु्ष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रींनी लग्न न करता स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहाण्याचा निर्णय घेतला. पण झगमगत्या विश्वात एक अशी अभिनेत्री आहे, जिला लग्नाची भीती वाटते. ज्या अभिनेत्रीला लग्नाची भीती वाटते ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘फोर मोर शॉट्स’ फेम अभिनेत्री सयानी गुप्ता आहे. सध्या सर्वत्र सयामी गु्प्ता हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

सयानी गुप्ता वयाच्या ३८ व्या वर्षी देखील एकटीच

अभिनेत्री म्हणाली, ‘आता वेळ पूर्णपणे बदलली आहे. सत्य आता पूर्णपणे बदललं आहे. सर्वकाही ठिक आहे, पण एका गोष्टीची मला अधिक भीती वाटते आणि ती म्हणजे जेव्ह पुरुष पत्नीची फसवणूक करतात. एखाद्याची फसवणूक करणं फार चुकीचं आहे, मग ते नातं कोणतंही असो..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘नात्यात होत असलेल्या फसवणुकीमुळे मला लग्न करायचं नाही. मला लग्नाची भीती वाटते असं देखील अभिनेत्री म्हणाली..’ सध्या सर्वत्र सयानी गुप्ता हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

सयानी गुप्ता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने ‘आर्टिकल १५’, ‘मार्गरिटा विद ए स्ट्रॉ’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे सयानी गुप्ता चर्चेत आली आहे. सयानी गुप्ता (Sayani Gupta) तिच्या वेगळ्या व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते.

सयानी गुप्ता हिचा जन्म 9 ऑक्टोबर 1985 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2012मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. सयानीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या सिनेमातून केली. त्यानंतर सयानी हिने कधी मागे वळून पाहिलं नाही. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘फॅन’ सिनेमात देखील अभिनेत्री झळकली.