Israel Hamas War : ‘नियतीचा खेळ…’, नशीब बलवत्तर म्हणून इस्रायलच्या हल्ल्यातून बचावली ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्री

Israel Hamas War : अभिनेत्री नुसरत भरुचा हिच नाही तर, इस्रायलच्या हल्ल्यातून 'तारक मेहता...' फेम अभिनेत्री देखील बचावली, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'हा फक्त नियतीचा खेळ...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा... 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्रीचे बचावले प्राण

Israel Hamas War : 'नियतीचा खेळ...',  नशीब बलवत्तर म्हणून इस्रायलच्या हल्ल्यातून बचावली 'तारक मेहता...' फेम अभिनेत्री
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 12:08 PM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : इस्त्रायलमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहे. दरम्यान, फिल्म फेस्टिवलसाठी गेलेली अभिनेत्री नुशरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमध्ये अडकली होती. पण आता अभिनेत्री सुखरुप भारतात परतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा हिच नाही तर, इस्रायलच्या हल्ल्यातून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेत्री देखील बचावली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत मोठी घटना शेअर केली आहे. एवढंच नाही तर, ‘हा फक्त नियतीचा खेळ…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

इस्रायलच्या हल्ल्यातून बचावणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘आता या क्षणी मी इस्त्रायलमध्ये असती.. हा विचार करुन थरकाप उडत आहे. माझे तिकिट बुक झाले होते. पण इस्त्रायल याठिकाणी जाण्याची योजना मला रद्द करावी लागली…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ”तारक मेहता…’ मालिकेसाठी मला इस्त्रायल याठिकाणी जाण्याची योजना मला रद्द करावी लागली. अचानक माझ्या शिफ्टची वेळ वाढवण्यात आली होती. सुरुवातीला मला दुःख झालं होतं. पण हा फक्त नियतीचा खेळ होता. ज्यामुळे माझे प्राण वाचले आहेत. आज मी इस्त्रायलमध्ये असती, तर माझे प्राण कदाचित गेले असते..

अभिनेत्रीने मानले देवाचे आभार

मुनमुन दत्ताने इस्त्रायलमध्ये शांतता नांदावी, अशी इच्छा व्यक्त करताना आपली देवावर श्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे मला कळत नाही. देव आहे आणि जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. मला विश्वास आहे आहे इस्त्रायलमधील तणावग्रस्त वातावरण लवकरच शांत होईल…’ सध्या सर्वत्र मुनमुन दत्ता हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगत आहे.

नुसरत भरुचा परतली भारतात

पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री इस्त्रायलमध्ये अडकली होती. रविवारी अभिनेत्रीला सुखरुप भारतात परत आणलं. पण मायदेशी परतल्यानंतर युद्धातून बचावलेली नुसरत भरूचा प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत दिसली. आता घडलेल्या घटनेवर अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.