Uorfi Javed | उर्फी जावेदचा ‘हा’ व्हिडीओ पाहून नेटकरीही काैतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, अभिनेत्रीने चक्क

उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे नेहमीच टिका देखील केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा तिच्यावर काही परिणाम होत नाही.

Uorfi Javed | उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही काैतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, अभिनेत्रीने चक्क
| Updated on: Jul 17, 2023 | 6:59 PM

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. अनेक मोठ्या मालिकांमध्ये उर्फी जावेद हिने महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच (Bigg Boss OTT) मिळालीये. उर्फी जावेद हिची आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते.

काही दिवसांपूर्वीच पापाराझी हे उर्फी जावेद हिला पाहून तिच्या जवळ गेले. मात्र, फोटो आणि व्हिडीओ घेण्यास पहिल्यांदातच उर्फी जावेद ही मनाई करताना दिसली. मी मेकअप केला नाहीये, माझे फोटो नका घेऊ असे म्हणताना उर्फी जावेद ही दिसली होती. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना देखील दिसला होता.

नुकताच उर्फी जावेद हिचा आता नवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील पावसातील आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक पहिल्यांदाच उर्फी जावेद हिच्यावर टिका करत नसून चक्क तिचे काैतुक करताना दिसत आहेत.

उर्फी जावेद हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुसळधार पावसामध्ये उर्फी जावेद ही पापाराझी यांना बॅग देण्यासाठी आलीये. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, उर्फी जावेद ही म्हणते, मी फक्त तुम्हाला बॅग देण्यासाठी आलीये, फोटो काढू नका. ही बॅग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

या बॅगमध्ये चार्जिंग देखील होते, यामुळे तुम्हाला कुठेही मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाहीये. यावेळी स्वत: उर्फी जावेद ही पापराझी यांना बॅग देताना दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यापूर्वी पापाराझी यांना वाॅच गिफ्ट करताना देखील उर्फी जावेद ही दिसली होती.