#TrendingBaby: थर्टी फर्स्टची पार्टी गाजवणारं ‘ट्रेंडिंग बेबी’ साँग आलं.. पार्टीचा मूड सेट करणारं भन्नाट गाणं रिलीज
#TrendingBaby: थर्टी फर्स्टला डीजेवर हेच गाणं वाजणार! जेन-झींना वेड लावणारं हे नवीन गाणं नुकतंच लाँच झालं आहे. हे गाणं एकदा ऐकायला घेतलं की पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.

#TrendingBaby: थर्टी फर्स्टची पार्टी असो किंवा मित्रांसोबतची धमाल, प्रत्येक सेलिब्रेशनला एक भन्नाट गाणं असायलाच हवं! असंच एक गाणं सध्या संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. ‘O Baby U R Trending In My Heart’ असं या गाण्याचं नाव असून, त्याचा हिप-हॉप, रॅप आणि रोमँटिक अंदाज तरुणाईला नक्कीच आकर्षित करणारा आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल लिहिण्यापासून ते संगीतबद्ध करण्यापर्यंत आणि गाण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनीच सांभाळली आहे. त्यामुळे हे गाणं आणखी खास ठरत आहे.
नऊ वर्षांपूर्वी सुचलं, आता आलं प्रेक्षकांच्या भेटीला
या गाण्याच्या जन्माची गोष्टही तितकीच रंजक आहे. उमेश कुमावत यांनी जवळपास नऊ वर्षांपूर्वी हे गाणं लिहिलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं लिहिण्यासाठी त्यांनी कोणतंही नियोजन केलं नव्हतं. गाडी चालवत असताना स्टेअरिंग हातात असतानाच त्यांना या गाण्याची कल्पना सुचली आणि हळूहळू शब्द आकाराला आले. त्यावेळी आजच्यासारखा ‘जेन झी’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता. मात्र, आजच्या तरुणाईच्या भावना अचूकपणे व्यक्त करणारं हे गाणं आता रिलीज झालं आहे.
‘तू मेरा क्रश है, तू मेरा रब है…’ प्रेमाची हटके गोष्ट!
कॉलेजच्या वयात एखादी मुलगी आवडणं, तिचं सतत नजरेसमोर असणं आणि तीच आपलं संपूर्ण जग असल्याची भावना निर्माण होणं, हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. याच भावना उमेश कुमावत यांनी गाण्यातून मांडल्या आहेत. ‘तेरी जैसी कोई नही, तेरी जैसी देखी नहीं, जब से मुझे होश है, तू मेरा क्रश है, तू मेरा रब है, तू मेरा सब है, तू मेरा रास्ता, तू सफर है…’ या ओळींमधून प्रेमात पडलेल्या तरुणाच्या भावना व्यक्त होतात. गाण्याचा रोमँटिक अंदाज, आकर्षक शब्दरचना आणि हिप-हॉपचा तडका यामुळे हे गाणं वेगळं ठरतं.
पहा गाण्याचा व्हिडीओ-
क्लब आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी परफेक्ट गाणं
हिप-हॉप, रॅप आणि रोमँटिक संगीताचा मिलाफ असलेलं ‘ट्रेंडिंग बेबी’ गाणं तरुणाईला डान्स करण्यास भाग पाडणारं आहे. विशेषतः थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, क्लब्स आणि न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये हे गाणं चांगलंच गाजण्याची क्षमता ठेवतं. एकदा ऐकायला सुरुवात केली की त्याची लय आणि शब्द गुणगुणावेसे वाटतात. नऊ वर्षांपूर्वी सुचलेली ही कल्पना आजच्या जेन झीच्या आवडीशी जुळणारी ठरतेय. त्यामुळे यंदाच्या न्यू इयर पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये ‘ट्रेंडिंग बेबी’ला आवर्जून स्थान मिळणार, यात काही शंका नाही.
विविध प्लॅटफॉर्म्सवर गाणं ऐकू शकता-
- युट्यूबवर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Apple Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Spotify वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Amazon Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Gaana वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.