Urfi Javed: उर्फी जावेदने पार केली बोल्डनेसची हद्द; पुन्हा शेअर केला हॉट लूकमधील व्हिडीओ

उर्फीच्या या व्हिडीओवर इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स आणि 19 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

Urfi Javed: उर्फी जावेदने पार केली बोल्डनेसची हद्द; पुन्हा शेअर केला हॉट लूकमधील व्हिडीओ
उर्फी जावेद
| Updated on: Jan 12, 2023 | 12:38 PM

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबतचा वाद ताजा असतानाच उर्फीने पुन्हा एकदा बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई रस्त्यांवर न्युडिटी पसरवल्यामुळे तिला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर उर्फीनेही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या तक्रारीवर उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून ती ट्विटरवर चित्रा वाघ यांच्या नावाचा उल्लेख करत उपरोधिक ट्विट करताना दिसतेय. आता पुन्हा एकदा उर्फीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत उर्फीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. उर्फी तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र याच कपड्यांमुळे ती अडचणीत आली आहे. असं असतानाही तिने तिचे फोटोशूट आणि व्हिडीओ पोस्ट करणं सुरूच ठेवलं आहे.

उर्फीच्या या व्हिडीओवर इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स आणि 19 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता उर्फी तिचे फोटोशूट करताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचे चार दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

“प्रत्येकाला विविध फॅशनचे कपडे घालणं, मेकअप करणं आणि सर्वोत्कृष्ट दिसणं आवडतं. मी जे काही करते, ते मी माझ्यासाठी करते. कारण चांगलं दिसणं कोणाला आवडत नाही? जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे,” असं उर्फी एका मुलाखतीत म्हणाली होती.

उर्फीने जिजी माँ, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर बिग बॉस ओटीटी आणि स्प्लिट्सविला 4 यांसारख्या रिॲलिटी शोजमध्ये ती सहभागी झाली होती.