Urmila Kanetkar : घटस्फोटानंतर उर्मिलाचा मोठा निर्णय, आनंद व्यक्त करत म्हणाली, तुम्हा सर्वांना…

Urmila Kanetkar : घटस्फोटानंतर उर्मिलानं मोठा निर्णय घेतला असून सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

Urmila Kanetkar : घटस्फोटानंतर उर्मिलाचा मोठा निर्णय, आनंद व्यक्त करत म्हणाली, तुम्हा सर्वांना...
| Updated on: Oct 20, 2026 | 7:43 PM

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री उर्मिला कानेटकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उर्मिलानं आता इन्स्टाग्रामवरील आपल्या नावात बदल केला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिनं ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. अभिनेत्रीच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अखेर उर्मिलानं बदललं इन्स्टाग्रामवरील नाव

Loading...

उर्मिला कानेटकर ही अभिनेत्री आजवर अनेकदा ‘उर्मिला कोठारे’ या नावाने ओळखली जात होती. मात्र, आदिनाथ कोठारेसोबत विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील नाव बदलण्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता तिच्या इन्स्टाग्राम युजरनेममध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. उर्मिलानं इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला. यासोबत तिनं ‘तुम्हा सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप शुभेच्छा‘ असं लिहिलं. तसेच, इन्स्टाग्रामवरील नाव बदलल्याबद्दल आनंद व्यक्त करत “Thank you Instagram” असंही म्हटलं. दसऱ्याच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमुळे तिच्या नव्या सुरुवातीची चर्चा रंगली आहे.

 

१५ वर्षांच्या संसारानंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी १६ जुलै २०२६ रोजी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला होता. बराच काळ त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, दोघांनीही त्यावेळी याबाबत कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर दोघांनी परस्पर संमतीनं आणि सामंजस्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

 

मुलगी जिजाच्या संगोपनासाठी दोघेही एकत्र

विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला, तरी मुलगी जिजा ही दोघांचीही प्राथमिकता असल्याचं आदिनाथ आणि उर्मिलाने आपल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केलं होतं. मुलीला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी दोघेही पालक म्हणून एकत्रितपणे तिचं संगोपन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल आणि एकमेकांबद्दल मनात आदर कायम असल्याचंही दोघांनी नमूद केलं होतं. या वैयक्तिक निर्णयाचा आदर करून आपल्या खासगी आयुष्यातील गोपनीयता जपण्याची विनंती त्यांनी चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us