AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर्फी प्रेमामुळे Urmila Matondkar चं करिअर संपुष्टात, ‘या’ पुरुषापासून वाचण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Urmila Matondkar: एकतर्फी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकर हिचं करियर संपलं, अभिनेत्रीने एका पुरुषापासून वाचण्यासाठी घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

एकतर्फी प्रेमामुळे Urmila Matondkar चं करिअर संपुष्टात, 'या' पुरुषापासून वाचण्यासाठी घेतला मोठा निर्णय
Urmila Matondkar
| Updated on: Sep 25, 2024 | 10:09 AM
Share

Urmila Matondkar Love Life: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. उर्मिला हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

एक काळ असा होता जेव्हा झगमगत्या विश्वात उर्मिला हिच्यासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते रांगेत होते. पण एकतर्फी प्रेमामुळे उर्मिलाचं करियर संपलं. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, उर्मीलाच्या प्रेमात होते. वर्मा यांनी स्वतःच्या प्रत्येक सिनेमांमध्ये उर्मिला हिला कास्ट केलं होतं.

सांगायचं झालं तर, ‘द्रोही’ सिनेमाच्या एका गाण्याच्या शुटिंग दरम्यान, रामगोपाल वर्मा यांना उर्मिला यांचा डान्स प्रचंड आवडला. त्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी ‘रंगीला’ सिनेमासाठी उर्मिला यांची निवड केली. ‘रंगीला’ हीट झाल्यानंतर रामगोपाल यांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला असायच्या. त्यानंतर दोघांच्या नात्याने आणखी जोर धरला. आजही त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

रिपोर्टनुसार, रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी उर्मिला यांनी अनेक दिग्दर्शकांना नकार दिला. ज्याचा परिणाम रामगोपाल वर्मा यांच्यासोबत असलेलं नातं संपल्यानंतर अभिनेत्रीला दिसून आला. त्यानंतर उर्मिला यांना सिनेमांसाठी ऑफर येणं बंद झालं. अखेर त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. पण अभिनेत्रीला राजकारणात देखील यश मिळालं नाही.

कोण आहे उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीर

राम गोपल वर्मा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर उर्मिला फार कमी सिनेमांमध्ये दिसली. अखेर 2016 मध्ये अभिनेत्रीने उद्योजक मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत केलं. मोहसिन अख्तर मीर हा कश्मीरी उद्योजक आहे. एवढंच नाही तर, त्याने काही सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे. उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. उर्मिला पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.