1300 कोटींची मालकीण असलेली ही अभिनेत्री कान्स रेड कार्पेटवर चक्क फाटलेल्या ड्रेसमध्ये

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेला फाटलेला ड्रेस घालून आल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिचा ड्रेस फाटलेला दिसत आहे. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या स्टाइल सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

1300 कोटींची मालकीण असलेली ही अभिनेत्री कान्स रेड कार्पेटवर चक्क फाटलेल्या ड्रेसमध्ये
Urvashi Rautela trolled
Image Credit source: instagram
| Updated on: May 19, 2025 | 4:16 PM

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्याच दिवशी ‘पॅरट लूक’मुळे आणि त्याच आकाराच्या क्लचमुळेही तिची खिल्ली उडवली गेली होती. आता तिला फाटलेल्या ड्रेसमुळे पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे.

उर्वशी रौतेलासोबत ‘उप्स मोमेंट’

उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिच्या कान्समधील उपस्थितीने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचा एक व्हिडिओ क्लिप X आणि अजून एक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,उर्वशीने घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेस फाटला होता आणि ती तशीच रेड कार्पेटवर आली होती. पण कॅमेरामध्ये तिचा हा ‘उप्स मोमेंट’ कैद झाला आहे.

नेटकऱ्यांनी कमेंट्स करत केलं ट्रोल

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. युजरने म्हटलं आहे “कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ड्रेसचं फिटिंग इतकं खराब आहे की तो फाटला? पण असं वाटतंय की हे मुद्दाम केलं गेलं आहे, जेणेकरून ती पुन्हा हेडलाइन्समध्ये येईल. यापूर्वी तिने उत्तराखंडमध्ये स्वतःचं मंदिर असल्याचं वक्तव्यही केलं होतं.” असं म्हणत तिची खिल्ली उडवण्यात आली.


कान्समधील पॅरट लूकमुळेही बरीच टीका सहन करावी लागली

उर्वशीच्या या लूकवरून सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिच्या स्टाइल सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यापूर्वीही तिच्या कान्समधील पॅरट थीमवर आधारित लूकमुळे तिला बरीच टीका सहन करावी लागली. उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या बिनधास्तपणाने अन् अनोख्या स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.