
#AskSRK Session : बॉलीवूडचा पठाण अर्थात शाहरुख खान (Shah rukh Khan) सध्या ‘जवान’ (Jawan) बनून त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. ‘पठाण’ ला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर त्याचा ‘जवान’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉक्सऑफीसवर नवा विक्रम रचण्यास उत्सुक असून हा चित्रपट पठाण चा रेकॉर्डही मोडतो का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, अभिनेत्याने चाहत्यांशी थोड्या गप्पा मारल्या. #AskSRK सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरूखला भरपूर, काही अतरंगीसुद्धा प्रश्न विचारले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षावही केला.
याच सेशनदरम्यान, एका चाहत्याने शाहरूखला असा अतरंगी प्रश्न विचारला जो ऐकून किंग खानही घाबरला ना राव.. ! हा प्रश्न फक्त शाहरुखच्या ‘जवान’शी संबंधित नव्हता, तर त्याच्या दुसऱ्या भागाशी देखील संबंधित होता.
Pehle yeh waali toh dekh lo….bachche ki jaan loge kya??!! #Jawan https://t.co/4E5vVXSnQ4
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2023
शाहरुखचा फोटो शेअर करत राजकुमार नावाच्या एका युजरने त्याला विचारले, ‘जवान 2 कधी येणार ?’ युजरच्या या अतरंगी प्रश्नाला उत्तर देताना शाहरूखेही त्याच शैलीत उत्तर दिले, ‘सर्वात आधी हा ( चित्रपट) तर पहा, बच्चे की जान लोगे क्या ?’ अशा मजेशीर अंदाजात शहरूखने रिप्लाय केला.
‘जवान’ बद्दल सांगायचं झालं तर येत्या 7 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शिक होणार असून त्यापूर्वी गेल्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेहमीप्रमाणे शाहरुखच्या चाहत्यांनी हा ट्रेलरही डोक्यावर घेतला आहे. लोकांमध्ये किंग खानची क्रेझ इतकी आहे की काहींनी संपूर्ण थिएटर हॉल बुक केला आहे तर काहींनी मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.