AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीवर वडिलांनी चाकूने हल्ला केला होता, आईने घराबाहेर काढलं; अन् आज मराठी, हिंदीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री

फिल्म इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे.  तसेच या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच अडचणी होत्या, संघर्ष होता पण त्यातून या अभिनेत्रीने स्वत:चं करिअर घडवलं, नेम-फेम कमावलं.कधीही अभिनयाची जिद्द सोडली नाही. आज ही अभिनेत्री हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

या अभिनेत्रीवर वडिलांनी चाकूने हल्ला केला होता, आईने घराबाहेर काढलं; अन् आज मराठी, हिंदीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री
Usha Nadkarni Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 6:08 PM
Share

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या आयुष्यात फार संघर्ष राहिला आहे. त्यातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ज्या आज एक लोकप्रिय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी जणू काही त्यांचं आयुष्यच फक्त त्यांच्या कामासाठी आणि अभिनयासाठी वाहिलं असावं एवढ्या त्या त्यांच्या कामासाठी झपाटलेल्या आहेत.

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या

उषा नाडकर्णी यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत. मग ते घरगुती वाद असो किंवा करिअरसाठी घेतलेली मेहनत असो. यासर्वांमधून मार्ग काढत उषा यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, टेलिव्हिजनमध्ये स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे. उषा यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका केल्या आहेत. पण त्यांना हिंदीमध्ये खरी ओळख मिळाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. त्यांना सगळेच आऊ आणि उषाताई म्हणतात.

आई-वडील खूप कडक होते

उषा यांनी भारती सिंग आणि हर्षच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासा केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे पालक त्यांच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते.उषा यांनी सांगितले की त्यांचे आई-वडील खूप कडक होते. वडील तर खूप हिंसक होते. एकदा, जेव्हा तिने तिच्या भावाला मारहाण होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वडिलांनी उषा यांच्यावरच चाकूने हल्ला केला होता.

वडिलांनी चाकूने हल्ला का केला होता?

त्या म्हणाली, “आम्हाला आमच्या वडिलांची खूप भीती वाटायची. जर आम्हा भावंडांपैकी एकाला जरी मारहाण झाली तर बाकीचे दोघे पळून जायचे. एकदा, वडील माझ्या भावाला काही कारणास्तव मारत होते आणि मी त्यांना थांबवण्यासाठी गेले. तेव्हा रागात त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि दुसऱ्या दिवशी मी दुखापतीसह कामावर गेले होते.”

आईने घराबाहेर हाकलून लावलं होतं. 

पुढे उषा म्हणाल्या जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला अभिनयाबद्दलच्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा आईने त्यांचे सर्व कपडे वैगरे घराबाहेर फेकून दिले आणि त्यांना घराबाहेर हाकलून लावले. त्यांचे वडील त्यांना घ्यायला येईपर्यंत उषाताई एक आठवडाभर त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी राहिल्या होत्या.

या सर्व संघर्षातून उषाताईंनी स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून घडवलं आहे. मराठी असो किंवा हिंदी त्यांचे नाव फार आदराने आणि प्रतिष्ठेने घेतले जाते. त्यांना असंख्य पुरस्कारही मिळाले आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....