भर मंचावारच लक्ष्याची ती खोडकर सवय मला खूप… ‘पवित्र रिश्ता’फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं असून त्यांना प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळालं. उषा यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत नाव कमावलं. त्यांनी काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील कलाकारांबाबत त्यांच्या स्वभावाबाबत सांगितले.

उषा नाडकर्णी यांनी मराठी सिनेसृष्टीतील लोकांवर टीका केली, मात्र अलका कुबल, विक्रम गोखले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या.
मुलाखती दरम्यान उषा नाडकर्णी यांनी अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्याबाबतही सांगितले. त्या म्हणाल्या, जेव्हा माझ्या पवित्र रिश्ता सिरियलचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा जवळच अक्षय कुमारच्या रावडी राठोड चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. मी तिथे गेले.
अक्षय कुमारने लगेच माझ्याकडे पाहिलं आणि मग गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. त्याचे मेकअप आर्टिस्ट वगैरे सगळे अगदी छान बोलतात, असं त्या म्हणाल्या.
इतकेच नाही तर पुढे उषा नाडकर्णी यांनी अलका कुबल यांच्याबद्दल सांगितले, की तिचं आणि माझं व्हॉट्सअॅप चॅट सुरूच असतं, कधी कधी ती कॉलही करते.
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना त्या भावूक झाल्या. त्यांनी 'निशीबवान'मध्ये सोबत काम केले आहे. खूप छान अभिनेता आणि स्वभावाचा धनी होता तो... असं त्या म्हणाल्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितले की चालू नाटकादरम्यान जर मी दिसले, तर तो नाटकातच काहीतरी नाव घेऊन ओळ म्हणायचा. खूप दिलखुलास होता.