AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूसुफ पठाणच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा सरकारने दिले मोठे गिफ्ट, थेट 20 कोटींची जमीन इतकी स्वस्त दिली की..

माजी क्रिकेटर आणि खासदार यूसुफ पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा दिल्या जात होत्या. 17 नोव्हेंबरला वाढदिवस होता. त्यातच आता भाजपाने यूसुफ पठाणला मोठे गिफ्ट दिले. थेट काही वर्षांपासून सुरू असलेला वाद झटक्यात मिटवला आहे.

यूसुफ पठाणच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा सरकारने दिले मोठे गिफ्ट, थेट 20 कोटींची जमीन इतकी स्वस्त दिली की..
Yusuf Pathan
| Updated on: Nov 20, 2026 | 1:10 PM
Share

लोकसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटर यूसुफ पठाण यांनी तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी केली. ही बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एका मागून एक मोठ्या आनंदाच्या बातम्या येत आहेत. त्यातच 17 नोव्हेंबर रोजी यूसुफ पठाणचा बर्थडे होता. या बर्थडेनंतर यूसुफ पठाणला सरकारकडून मोठे गिफ्ट देण्यात आले. कोट्यावधी रूपयांच्या प्लाटवरून मोठा वाद सुरू होता. त्यातच गुजरात सरकारने यूसुफ पठाणला मोठे गिफ्ट दिले. वडोदरा नगर परिषद यांच्याकडून थेट निर्णय घेण्यात आला. 17 नोव्हेंबरला यूसुफ पठाण 44 वर्षांचे झाले. बर्थडेच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने मोठे गिफ्ट दिले. विशेष म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून या बातमीची वाट यूसुफ पठाण बघत होते. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यूसुफ पठाणबद्दल सरकारची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे.

गुजरातमध्ये ज्या जमिनीसाठी भाजपा सरकारने यूसुफ पठाणला कोर्टाच्या चक्कर मारण्यास भाग पाडले, आज तिच जमीन अर्धी फुकटमध्ये तर अर्धी कमी किंमतीमध्ये देऊन खुश केले. वडोदरा नगर परिषदेने बुधवारी 18 नोव्हेंबरला गुजरात सरकारच्या प्रस्ताव मंजूर केला. ज्यात तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार युसुफ पठाणला 987 मीटर जमीन देण्याचा निर्णय घेतला. यातील विशेष बाब म्हणजे आदल्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरला यूसुफ पठाणचा वाढदिवस होता.

देशातून यूसुफ पठाण यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. दुसऱ्याच दिवशी भाजपा सरकारने तो तो जागेबद्दल निर्णय दिला. 2011 वर्ल्ड कप विजेता टीममध्ये युसुफ पठाण होता. पठाण यांना 2012 मध्येच ही जमीन हवी होती. वडोदराच्या तंडलजा परिसरातील 500 मीटर जमीन यूसुफ पठाणला मोफत मिळणार आहे.हेच नाही तर 478 टक्क्यात 54 टक्के डिस्काऊंटही दिला जाणार आहे. बाजार भावाप्रमाणे 55 टक्के पठाणला भरावी लागणार आहेत. यानुसार, 20.53 कोटी भाव ठरवण्यात आला. 500 वर्ग मीटर जमीन मोफतमध्ये दिली जाणार आहे.

478 वर्ग मीटर जमिनीची किंमत 10.3 कोटी होती. कोट्यावधी रूपये किंमत असलेली जमिनीवर 45 टक्के सवलत दिली जातंय. म्हणजेच ही जमीन यूसुफ पठाणला 5.51 कोटींमध्ये मिळेल. या वाद 2012 पासून सुरू आहे. 2012 मध्ये पठाणने आपल्या घराशेजारी असलेला भूखंड हा सरकारकडे 99 वर्षांच्या करारावर मागितली होता. सुरक्षेच्या कारणामुळे यूसुफ पठाणला हा भूखंड हवा होता. सुरूवातीला स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य केला. मात्र, राज्य सरकारने शहरी विकास जून 2014 मध्ये हा प्रस्ताव रद्द केला. त्यानंतर वडोदरा नगर परिषदेने आरोप केला की, हा प्रस्ताव रद्द झाल्यानंतरही यूसुफ पठाणने त्या जागेवर कंपाऊंट केले आणि अतिक्रमण केले.

Follow Us
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...