Nana Patekar: नाना पाटेकर यांचे वागणे पाहून मी थक्क झालो; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने वेधले लक्ष

Nana Patekar: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी यूपी पोलिसांच्या एका कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Nana Patekar: नाना पाटेकर यांचे वागणे पाहून मी थक्क झालो; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने वेधले लक्ष
Yogi Adityanath and nana patekar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 15, 2026 | 8:07 AM

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘खाकी का सितारा’ या गीताच्या लाँचिंगप्रसंगी बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर आणि गायक व संगीतकार शंकर महादेवन हेही उपस्थित होते. या प्रसंगी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तव्य केले. त्यांनी नाना पाटेकर यांची प्रशंसा केली आणि म्हणाले की नाना पाटेकर यांनी जे काही केलं पाहून मी थक्क झालो होतो.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांची केली प्रशंसा

या प्रसंगी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की महाराष्ट्रात जेव्हा मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा नाना पाटेकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. “नाना पाटेकर केवळ एक अभिनेते नाहीत, तर ते तितकेच संवेदनशील माणूसही आहेत. महाराष्ट्रात जेव्हा शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करत होते, तेव्हा ज्या व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला तो दुसरा कोणी नसून नाना पाटेकर होते.”

नाना पाटेकर यांना भेटून योगी आदित्यनाथ थक्क झाले

योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा नाना पाटेकर शेतकऱ्यांसाठी काम करत असताना त्यांना भेटायला आले आणि आपला परिचय दिला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी म्हटले, “मी थक्क झालो होतो. इतका मोठा अभिनेता शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, पण हे सत्य आहे.” त्यांनी सांगितले की नाना पाटेकर यांनी सगळे काम कोणत्याही प्रसिद्धी किंवा दिखाव्याशिवाय शांतपणे केले.

नाना पाटेकर यांच्यासोबत यूपी पोलिसांनी शॉर्ट फिल्म बनवली होती

सीएम योगी आदित्यनाथ यांनी हेही सांगितले की पाटेकर यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर सुरक्षा अभियानातही एका शॉर्ट फिल्मद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यास मदत केली. या प्रसंगी योगी आदित्यनाथ यांनी शंकर महादेवन यांचीही प्रशंसा केली. उत्तर प्रदेश पोलिसांचे गाणे ‘खाकी का सितारा’ शंकर महादेवन यांनी आपल्या आवाजाने सजवले आहे. जानेवारी २०२६ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी सायबर गुन्हे, विशेषतः डिजिटल अरेस्टबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी नाना पाटेकर यांच्यासोबत एक शॉर्ट फिल्म बनवली होती. योगी आदित्यनाथ त्याच फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याची प्रशंसा करताना दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us