AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते..; वंदना गुप्ते संतापल्या, नवी मुंबई एअरपोर्टचा व्हिडीओ चर्चेत

विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना शेवटच्या टप्प्यावर अडचणी येऊ नयेत, यासाठी रस्त्यांवरील साइनज व्यवस्था स्पष्ट आणि पुरेशी असणं गरजेचं आहे. त्यामुळे वंदना गुप्ते यांनी उपस्थित केलेला मुद्दा केवळ एका अभिनेत्रीची नाराजी न राहता प्रवाशांच्या सोयीशी संबंधित प्रश्न ठरत आहे.

तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते..; वंदना गुप्ते संतापल्या, नवी मुंबई एअरपोर्टचा व्हिडीओ चर्चेत
वंदना गुप्तेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2026 | 2:20 PM
Share

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरातील रस्ते, वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या रोखठोक वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. वंदना गुप्ते या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक आणि सार्वजनिक मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडण्यासाठीही ओळखल्या जातात. एखादी गोष्ट गैरसोयीची किंवा चुकीची वाटली तर त्याबाबत आवाज उठवण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत. यावेळी त्यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील रस्त्यांवरील साइनबोर्ड ठरला आहे.

दिशा समजण्यासाठी फलक नसल्याने नाराजी

विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांना योग्य मार्ग समजण्यासाठी पुरेसे दिशादर्शक फलक असणं गरजेचं आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणीच योग्य साइनबोर्ड दिसत नसल्याबद्दल वंदना गुप्ते यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना कोणत्या दिशेने जायचं, कोणता मार्ग घ्यायचा किंवा पुढे कोणता रस्ता आहे, याची माहिती सहज मिळायला हवी. विशेषतः पहिल्यांदाच या भागात येणाऱ्या वाहनचालकांसाठी स्पष्ट दिशादर्शक फलक अत्यंत आवश्यक आहेत.

‘खर्च परवडत नसेल तर मी पैसे देते’

या व्हिडीओमध्ये वंदना म्हणाल्या, “मी मुंबईहून कोल्हापूर एअरपोर्टला जात आहे. यासाठी मी नवी मुंबईच्या एअरपोर्टवरून प्रवास करणार आहे. नवी मुंबई एअरपोर्टला मी अटल सेतूनं आले आहे. पण इथे कुठल्याच ठिकाणी एअरपोर्टसाठीची खूण किंवा बोर्ड लावलेला नाही. आम्ही अंदाज घेत एअरपोर्टच्या दिशेनं प्रवास करतोय. मला काहीच कळत नाहीये, हा रस्ता नक्की कुठे जातोय? हाच रस्ता जर एअरपोर्टला पोहोचत असेल तर कृपया इथे बोर्ड लावा. तुमच्याने जमत नसेल तर मी स्वत: बोर्डसाठी पैसे खर्च करते. मी माझ्या पैशांनी बोर्ड लावते.”

वंदना गुप्ते यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही यावर चर्चा सुरू झाली आहे. विमानतळासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रवाशांना स्पष्ट माहिती देणारी यंत्रणा असणं आवश्यक आहे, असं मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.

Follow Us
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी