Nana Patekar: नाना पाटेकरांना वेळीच मदत मिळाली असती, तर..; वर्षा उसगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना

Nana Patekar: नाना पाटेकर यांचं असं अचानक जाणं हे मनाला चटका लावणारं आहे, अशा शब्दांत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली असती तर ते आज आपल्यात असते, असंही त्या म्हणाल्या.

Nana Patekar: नाना पाटेकरांना वेळीच मदत मिळाली असती, तर..; वर्षा उसगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना
वर्षा उसगांवकर, नाना पाटेकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 12:56 PM

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना वयाच्या 75व्या वर्षी जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनीही नानांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नानांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली असती, तर ते आजही आपल्यासोबत असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे नानांच्या अचानक जाण्याने कलाकारांच्या मनात निर्माण झालेली हुरहूर पुन्हा एकदा समोर आली आहे.

वर्षा उसगांवकर यांनी आयएएनएसशी बोलताना नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आज वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे माणूस वयाची शंभरीही गाठू शकतो, असं त्या म्हणाल्या. नानांसारख्या गुणी कलाकाराचं इतक्या लवकर जाणं मनाला चटका लावणारं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षा म्हणाल्या की, नानांना त्या वेळी आवश्यक वैद्यकीय मदत मिळाली असती, तर कदाचित ते आजही आपल्यात असते. 75 हे काही जाण्याचं वय नाही, असं म्हणत त्यांनी नारं आहनांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.

Loading...

नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे आपलं भाग्य असल्याचं वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं. दोघांनी ‘तिरंगा’ या हिंदी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात नाना पाटेकर आणि राज कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. देशभक्ती, धाडस आणि संघर्ष यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. नानांच्या अभिनयाची व्याप्ती मोठी होती. विनोदी भूमिका असो, गंभीर व्यक्तिरेखा असो किंवा खलनायकाची भूमिका, प्रत्येक भूमिकेत ते स्वतःची वेगळी छाप सोडत असत. वर्षा यांनी नानांच्या अभिनयाची आठवण सांगताना ‘तिरंगा’मधील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं.

नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचा संदेश त्यांनी मध्यरात्री मित्राला पाठवला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचारांना यश आलं नाही. नानांच्या निधनानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us