AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: त्याने जे मला शिव्या दिल्या..; शिवाजी साटम यांनी सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा

Nana Patekar: मुंबईत आयोजित केलेल्या शोकसभेत शिवाजी साटम यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. नानाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर हिंदी सिनेमात माझे जे पाय रोवले गेले ते नानामुळे.. असं ते म्हणाले.

Nana Patekar: त्याने जे मला शिव्या दिल्या..; शिवाजी साटम यांनी सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा
Shivaji Satam and Nana PatekarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 12:28 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. नानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने नानांसोबतच्या आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनीही नानांसोबतचा एक खास किस्सा सांगितला. नानांमुळेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवले गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नानांनी आपल्यासाठी घेतलेली भूमिका आणि कमी मानधन घेतल्यामुळे दिलेल्या शिव्यांचा किस्सा सांगताना शिवाजी साटम जुन्या आठवणींमध्ये रमले.

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या जवळपास 40 वर्षांच्या आठवणी असल्याचं शिवाजी साटम यांनी सांगितलं. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांचा नानांशी संबंध आला. नानांचं अचानक जाणं मनाला चटका लावणारं असल्याचं सांगताना त्यांना या धक्क्यावर विश्वास बसत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवाजी साटम म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण होण्यामागे नानांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच आपल्याला हिंदी चित्रपटांकडे वळवलं. त्यामुळे नाना हे केवळ सहकलाकार नव्हते, तर आपल्या कारकिर्दीला दिशा देणारे मित्र होते.

‘यशवंत’ चित्रपटासाठी नानांनीच केली शिफारस

शिवाजी साटम यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा सांगितला. ‘यशवंत’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट असल्याची आठवण त्यांनी सांगितली. या चित्रपटात त्यांना इन्स्पेक्टरची भूमिका मिळाली होती. निर्मात्यांनी त्यांना बोलावून भूमिका समजावून सांगितली, मात्र इन्स्पेक्टरची भूमिका ऐकताच त्यांनी थेट नकार दिला. निर्मात्यांनी त्यांना सांगितलं की, त्यांच्या एका मित्रानेच ही भूमिका करण्यासाठी त्यांचं नाव सुचवलं आहे. तो मित्र कोण, असं विचारल्यावर निर्मात्यांनी नाना पाटेकर यांचं नाव घेतलं. त्यावर शिवाजी साटम यांनी नानांनी सांगितलं म्हणून आपण भूमिका का करावी, असा प्रश्न उपस्थित केला.

अखेर निर्मात्यांनी नानांना फोन केला. त्यानंतर नानांनी शिवाजी साटम यांना त्यांच्या खास शैलीत, संस्कृतमधून समजावून सांगितलं. दोघांमध्ये अशाच प्रकारे संवाद होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नानांच्या समजावण्यामुळे अखेर शिवाजी साटम यांनी भूमिका स्वीकारली. ‘यशवंत’ चित्रपटाचं शूटिंग वरळीत सुरू झालं होतं. त्यावेळी नानांनी शिवाजी साटम यांना हळूच विचारलं की, मानधनाबाबत बोलणं झालं का? शिवाजी साटम यांनी होकार देत किती पैसे ठरले, हेही सांगितलं. मात्र, त्यांनी सांगितलेली रक्कम ऐकताच नाना संतापले. ‘तू मला का नाही विचारलं?’ असा सवाल करत नानांनी त्यांना चांगलंच सुनावलं. शिवाजी साटम यांना नानांच्या या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं. ‘अरे, या गोष्टीसुद्धा मी तुला विचारायच्या?’ असं त्यांनी नानांना म्हटलं.

त्यानंतर नानांनी थेट निर्मात्यांनाच बोलावलं. शिवाजी साटम यांनी नानांना समजावण्याचा प्रयत्न केला की, आपण चित्रपट करण्याचा शब्द दिला आहे आणि शूटिंगही सुरू झालं आहे. मात्र, नाना ऐकायला तयार नव्हते. निर्मात्यांनाही नानांसमोर हात जोडून उभं राहावं लागलं. शिवाजी साटम यांनी आणखी एका चित्रपटाची आठवण सांगितली. नानांनी त्यांना ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगितलं होतं. या चित्रपटातील भूमिका पुरस्कार मिळवून देऊ शकते आणि ती नायकाच्या तोडीची आहे, असं नानांनी त्यांना सांगितलं. शिवाजी साटम यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता कोण, असं विचारल्यावर नानांनी ‘मी’ असं उत्तर दिलं.

नानांच्या या आठवणींमधून त्यांचं मित्रांवरील प्रेम, सहकलाकारांच्या कामाबद्दलची आस्था आणि त्यांना पुढे नेण्याची वृत्ती समोर येते. त्यामुळेच नानांच्या जाण्यानंतरही त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहणार आहेत.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा