मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते तथा रिमा लागू यांचे पती विवेक लागू यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही.

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.दरम्यान विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी मराठीसह हिंदीमध्येही काम केले होते.
20 जून रोजी मुंबईतील अंधेरी परिसरात होणार अंत्यसंस्कार
19 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 20 जून रोजी, शुक्रवारी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
विवेक यांच्या गाजलेल्या कलाकृती
विवेक यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), ’31 दिवस’ (2018) इ.त्यांचे गाजलेले काम आहे. तसेच मालिकांबद्दल बोलायचं झाल्यास ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकाही गाजल्या होत्या.
रिमा लागू आणि विवेक यांचा घटस्फोट झाला होता
विवेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पत्नी रिमा लागू यांचं लग्नाआधीचं नाव नयन बडबडे असं होतं. रिमा यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी केली, तेव्हा कलाकारांसाठी खास कोटा होता. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान त्यांनी आणि विवेक यांची भेट झाली होती. विवेक तेव्हा 23 वर्षांचे होते तर, रिमा यांचे वय 18 होते. दोन वर्षांच्या प्रेमानंतर ते 1978 साली दोघांनी लग्न केले. काही वर्षांनी त्यांच्यातील मतभेद वाढू लागल्याने त्यांचा घटस्फोट झाला होता. मात्र घटस्फोटानंतरही रिमा लागू यांनी हेच नाव लावलं.
विवेक लागू यांच्या जाण्याने नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे. तसेच मराठी मनोरंजन विश्वात नक्कीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.