राघवेंद्र कडकोळ : ओम फट स्वाहा आठवतोय? एका ‘झपाटलेल्या’ आयुष्याची ‘एकाकी’ अखेर !

| Updated on: Feb 04, 2021 | 9:26 PM

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. (Veteran actor Raghvendra Kadkol Died)

राघवेंद्र कडकोळ : ओम फट स्वाहा आठवतोय? एका झपाटलेल्या आयुष्याची एकाकी अखेर !
Follow us on

पुणे : ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. कडकोळ यांनी झपाटलेला या चित्रपटात बाबा चमत्कार ही भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकेत त्यांनी काम केले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (Veteran actor Raghvendra Kadkol Died)

राघवेंद्र यांनी कृष्णधवल या चित्रपटापासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात त्यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती.

वृद्धाश्रमात वास्तव्य

झपाटलेला चित्रपटावेळी  राघवेंद्र यांचे वय 50 होते तर झपाटलेला 2 वेळी ते 70 वर्षांंचे होते. या दोन्ही चित्रपटात त्यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा साकारली होती. प्रेक्षकांच्या ही ती भूमिका लक्षात राहिली. मात्र त्यांच्यावर हलाखीच्या परिस्थितीत जीवन करण्याची वेळ आली आहे. प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आला नाही याची खंत त्यांना लागून आहे. राघवेंद्र हे त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर येथे राहतात.

बालगंधर्व जीवन पुरस्काराने गौरव 

त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.  त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी राघवेंद्र यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.  त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहीले आहे. (Veteran actor Raghvendra Kadkol Died)

संबंधित बातम्या :

आईशिवायची पोर, बापही दूर, बॉयफ्रेंडही गमावला, दु:खाचा डोंगर कोसळला, मग संजय दत्तच्या मुलीनं काय केलं? एक प्रेरणादायी बातमी

Vidarbha Ratna : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, श्रेयश जाधव ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने सन्मानित