संजीव कुमार यांच्या आयुष्यातील अनेक किस्से वाचायला मिळणार, लवकरच लाँच होणार बायोग्राफी!

अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्या बायोग्रफिची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से आणि कथांविषयी माहिती वाचायला मिळणार आहे.

संजीव कुमार यांच्या आयुष्यातील अनेक किस्से वाचायला मिळणार, लवकरच लाँच होणार बायोग्राफी!
संजीव कुमार
| Edited By: | Updated on: Apr 22, 2021 | 10:06 AM

मुंबई : अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्या बायोग्रफिची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से आणि कथांविषयी माहिती वाचायला मिळणार आहे. सामान्यत: बऱ्याचदा कलाकारांचे चरित्र ते हयात असतानाच लाँच केले गेले आहे. परंतु, संजीव कुमार यांचे चरित्र त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 36 वर्षानंतर प्रकाशित केले जाणार आहे (Veteran actor Sanjeev kumar biography will launch soon).

अलीकडेच, ही बायोग्राफी लिहिणाऱ्या लेखिका रीता रामामूर्ती गुप्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या चरित्रविषयक काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. रीता यांना जेव्हा विचारले गेले की, आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या अनेक चरित्रात असे काही वादग्रस्त खुलासे झाले आहेत की, त्यानंतर अनेक कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. तर हे देखील असेच वादग्रस्त पुस्तक असेल का? यावर त्या म्हणाल्या की, ही एक ऐतिहासिक नोंद आहे. मला सर्व वाचकांना पुन्हा एकदा संजीव कुमार साहेबांच्या आयुष्यात न्यायचे आहे आणि हेच खरे आव्हान आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, कुटुंब आणि काही चाहते स्वतःहून समोर आले, ज्यांनी त्यांचे बरेच लेख, चित्रपट पोस्टर्स, गाण्यांची पुस्तके पाठवली. यामुळे मला त्यांच्या आयुष्याची पुनर्रचना करण्यास मदत झाली.

2 वर्षांहून अधिक काळापासून लेखन सुरु…

हे चरित्र लिहिण्यास 2 वर्षांहून अधिक कालावधी लागला. संजीव कुमार साहेब यांच्या मित्रांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अनुभव उघडपणे त्यांच्याशी शेअर केले. राज कुमार, सुनील दत्त साहेब आणि दक्षिण भारतीय सुपरस्टार शिवाजी गणेशन या यांच्यासारखे अनेक दिग्गज आता राहिले नाहीत, ज्यांच्याशी मला बोलण्याची गरज वाटली होती आणि ते मी करू शकले नाही. इतकेच नाहीतर यात आणखीही एक व्यक्ती होती ती म्हणजे, त्यांचे व्यवस्थापक जमनादासजी, ज्यांचे 2006 मध्ये निधन झाले. मला वाटते ते जर हयात असते, तर पुस्तकाला वेगळा स्वाद मिळाला असता, असे रीता म्हणतात (Veteran actor Sanjeev kumar biography will launch soon).

36 वर्षानंतर बायोग्राफी का?

संजीव कुमार यांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर हे चरित्र आता प्रकाशित होण्यास पात्र आहे का? विचारले असता, रीता म्हणातात, ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संजीव कुमार यांचा मृत्यू इंटरनेटसारखी सुविधा उपलब्ध नसताना झाला होता. मग, या पुस्तकात तुम्हाला त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळेल. भारतातील बेस्ट फिल्म स्कूलमध्ये संजीव कुमार साहेबांबद्दल वाचले जाते आणि व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय, ते कसे दुरुस्त करावे, हे समजून घेतले जाते. येथे कॅमेर्‍यासमोर कसे जायचे, हे शिकवले जाते. या चरित्रातून, लोक त्यांच्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतील. संजीव कुमार यांचे चाहते या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 6 नोव्हेंबर 1985 रोजी संजीव कुमार यांचे वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

(Veteran actor Sanjeev Kumar biography will launch soon)

हेही वाचा :

Radhe | ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा चित्रपट!

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!