AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विजय राज (Vijay Raaz) यांना अंतरिम दिलासा दिला आहे. हायकोर्टाने विजय राज यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!
विजय राज
| Updated on: Apr 21, 2021 | 1:58 PM
Share

मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विजय राज (Vijay Raaz) यांना अंतरिम दिलासा दिला आहे. हायकोर्टाने विजय राज यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. ‘शेरनी’ (Sherni) या चित्रपटाच्या महिला क्रू मेंबरचा विनयभंग आणि छेडछाड केल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला आहे (Vijay Raaz molestation Case update actor get interim relief from Bombay high court).

गोंदिया जिल्ह्यातील दंडाधिकारी न्यायालयात विजय राजविरोधात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यातील सर्व कारवाईला स्थगिती देण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबर 2020 रोजी विजय राजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विजय राज यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

विजय राज यांनी प्रतिमा खराब करण्याचा आरोप

अभिनेता विजय राज यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, चित्रपटाच्या क्रू मेंबर महिलाने आपल्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार ही केवळ आपली प्रतिमा खराब करणे आणि लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने केली आहे. या याचिकेत त्यांनी महिलेबरोबर कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते म्हणतात की, लैंगिक छळ हा केवळ तेव्हाच वैध असतो, जेव्हा तेथे एकतर शारीरिक संपर्क असतो, अश्लीलता दर्शवली जाते किंवा शारीरिक संबंधांची मागणी केली जाते. या ज्येष्ठ अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्याने असे कोणतेही कृत्य केले नाही, जे लैंगिक छळाच्या श्रेणीत येते.

राज यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले होते की, ते प्रथमच गोंदियाला गेले होते. ते सेटवर नवीनच होते, म्हणून कॉल टाइमिंग्ज आणि इतर गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणे हे सहाय्यक दिग्दर्शकाचे काम होते. विजय राजविरूद्ध तक्रार करणारी ही स्त्री ‘शेरनी’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक होती (Vijay Raaz molestation Case update actor get interim relief from Bombay high court).

विजय राज यांच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक दिग्दर्शकांना शूटशी संबंधित प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. त्या सहाय्यक दिग्दर्शिकेला व्हॅनिटी व्हॅन, वेशभूषा, लूक आणि मेकअप सारख्या महत्त्वाच्या वस्तू आणि दृश्यांविषयी माहिती देण्याचे काम सोपवण्यात आले होते. या महिला सहाय्यक दिग्दर्शिकेने केलेले आरोप निराधार आहेत.

विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही ‘शेरनी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशात सुरु होती, त्यावेळी विजय राजवर चित्रपटाशी संलग्न एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात विजय राज यांचे नाव जोडताच त्यांना या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी समिती नेमली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

(Vijay Raaz molestation Case update actor get interim relief from Bombay high court)

हेही वाचा :

Vijay Raaz | दुसरी बाजू जाणून न घेता आरोपी ठरवले, छेडछाडीच्या आरोपांवर विजय राज यांची प्रतिक्रिया

सोनू सूदने सांगितला कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा फंडा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.