‘या’ दिग्गज अभिनेत्याचं निधन; २०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये केलं काम… सिनेविश्वाला मोठा धक्का

'या' दिग्गज अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास.. कुटुंबावर दुःखाचा डोंगर... सिनेविश्वासह चाहत्यांना मोठा धक्का..

या दिग्गज अभिनेत्याचं निधन; २०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये केलं काम... सिनेविश्वाला मोठा धक्का
| Updated on: May 22, 2023 | 5:30 PM

मुंबई : झगमगत्या विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.. दाक्षिणात्य सिनेविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी सरथ बाबू यांनी अखेरचा श्वास घेतला.. सरथ बाबू यांच्या निधनाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र सरथ बाबू यांच्या निधनाची चर्चा रंगत आहे. सरथ बाबू यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. तर चाहते देखील सरथ बाबू यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

सरथ बाबू याचं हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.. त्यांच्या शरीरातील काही अवयव निकामी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. सरथ बाबू व्हेंटिलेटरवर होते. पण उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं.. २२ मे रोजी सरथ बाबू यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, सरथ बाबू यांच्या जवळच्या व्यक्तीने अभिनेत्याच्या निधनाची बातमी दिली..

 

 

सरथ बाबू दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. महत्त्वाचं म्हणजे, सरथ बाबू यांनी आतापर्यंत तब्बल २०० सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. अशात सरथ बाबू यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘रामा राज्यम’ या तेलुगू सिनेमातून सरथ बाबू यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं..

त्यानंतर सरथ बाबू यांनी तामिळ सिनेविश्वात देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सरथ प्रभू यांच्या पहिल्या तामिळ सिनेमाचं नाव ‘पट्टिना प्रावेसम’ होतं.. ‘सरपंचरम’ या सिनेमातून त्यांनी मल्याळम सिनेसृष्टीतही पाऊल ठेवलं. ‘सरपंचरम’ १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सरथ बाबू यांची सिनेविश्वातील कारकीर्द जवळपास ५  दशकांची आहे. या वर्षांत त्यांनी अनेक उत्तमोत्तम सिनेमांमध्ये काम केले आणि लोकांना हसवलं. मात्र, अचानक त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. साऊथ सुपरस्टार रजनीकांत कमल हासन यांसारख्या सर्व बड्या स्टार्ससोबत सरथ बाबू यांनी काम केले.