आता Vodafone Ideaचे दिवस बदलणार, किंग खानवर मोठी जबाबदारी, jio चं टेन्शन वाढलं

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बनला Vodafone Ideaचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर. ‘Vi बदल रहा है... तैयार रहिए’ मोहिमेसह कंपनीची नवी ओळख. कसा असणार नवीन लोगो?

आता  Vodafone Ideaचे दिवस बदलणार, किंग खानवर मोठी जबाबदारी, jio चं टेन्शन वाढलं
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 03, 2026 | 5:55 PM

भारतातील सर्वात चर्चेत असणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आयडिया (Vi)ने आपल्या ब्रँडमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याची नवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली असून, यासोबतच कंपनीने आपला नवीन लोगो आणि नवी ब्रँड कॅम्पेनही लॉन्च केली आहे.

कंपनीने ‘Vi बदल रहा है… तैयार रहिए’ या नावाने नवीन मोहिमेला सुरुवात केली आहे. शाहरुख खान या मोहिमेचा चेहरा असणार असून, त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेत कंपनीला ग्राहकांमध्ये आपली ब्रँड ओळख अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

‘V!’ ऐवजी आता ‘Vi’ अशी नवी ओळख

शाहरुख खानला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासोबतच Viने आपल्या लोगोमध्येही बदल केला आहे. यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या ‘V!’ ऐवजी आता ‘Vi’ ही नवी ओळख वापरली जाणार आहे.

कंपनीने आपल्या विद्यमान ब्रँडच्या व्हिज्युअल ओळखीलाही अधिक आधुनिक स्वरूप दिलं आहे. लोगोच्या वरच्या भागात डायनॅमिक 3D स्फिअरचा वापर करण्यात आला असून, त्यातून ऊर्जा, आशावाद आणि भविष्यातील नव्या शक्यता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही नवी ब्रँड ओळख 1 सप्टेंबरपासून कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रांपासून डिजिटल प्लॅटफॉर्म, रिटेल नेटवर्क आणि विविध कम्युनिकेशन माध्यमांवर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

CEO काय म्हणाले?

Viचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत किशोर यांच्या मते, हा बदल केवळ लोगोला नवीन रूप देण्यापुरता मर्यादित नसून, कंपनीच्या व्यापक बदलाची ही सुरुवात आहे. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासोबतच टेलिकॉम क्षेत्राच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ब्रँडमध्ये हा बदल होत असतानाच Viकडून 5G नेटवर्कचा विस्तारही सुरू आहे. कंपनीकडे सध्या 17 सर्कल्समध्ये मिड-बँड 5G स्पेक्ट्रम आणि 16 सर्कल्समध्ये mmWave स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. कंपनी 17 सर्कल्समध्ये 5G सेवा विस्तारण्याच्या दिशेने काम करत आहे.

त्यामुळे शाहरुख खानचा चेहरा, नवा लोगो आणि ‘Vi बदल रहा है… तैयार रहिए’ ही मोहीम यामधून कंपनीने ग्राहकांसमोर आपली नवी आणि अधिक आधुनिक ब्रँड ओळख मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us