Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनीची ही मजेदार पोस्ट

| Updated on: Dec 09, 2021 | 5:03 PM

विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनी ड्युरेक्सने एक ट्विट केले आहे. ते ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनीची ही मजेदार पोस्ट
तसेच कतरिना आणि विकी कौशल एका मुलाखतीमध्ये सोबत दिसले होते. लॉकडाऊनच्या काळात विकी कौशल कतरिनाच्या घरी जाताना दिसलेला आहे. तसेच ते अनेक पार्ट्यांमध्येसुद्धा एकत्र दिसलेले आहेत.
Follow us on

मुंबई :  सध्या सर्वात्र चर्चा आहे ती विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची. या शाही लग्नसोहळ्यासाठी राजस्थानमधील शाही ठिकाण सज्ज आहे. विकी कौशलची वरातही पोहचल्याची ताजी माहिती समोर आली आहे. विकी कौशल आणि कतरीना कैफ त्यांच्या नव्या वैवाहीक आयुष्याला सुरूवात करत आहे. अशातच त्यांच्या विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर विकी-कतरीनाच्या नावाचे हॅश्टॅग ट्रेंडिंग आहे. तर दुसरीकडे एका पोस्टे धुमाकूळ घातला आहे.

कंडोम कंपनीचे ट्विट व्हायरल

विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनी ड्युरेक्सने एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाला विकी-कतरीनाच्या लग्नात कंडोम कंपनीचा काय संबंध? या पोस्ट एवढी काय चर्चा होत आहे? पण कंडोम कंपनीने केलेली पोस्टच एवढे मजेदार आहे, की त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट यायला सुरूवात झाली आहे. ती पोस्ट काय आहे, तुम्हीच पाहा.

कंडोम कंपनीच्या ट्विटवर नेटकरी फिदा

विकी आणि कतरीना लग्नाला आम्हाला इनव्हाईट केले नसेल तर तुम्ही मस्करी करताय, अशा आशयाची पोस्ट कंडोम कंपनीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे कंडोम कंपनीच्या या पोस्टवर नेटकरी फिदा झाले आहेत नेटकऱ्यांच्या एवढ्या भन्नटा कमेंट या पोस्टला यायला लागल्या आहेत, की हसून हसून तुमचं पोट दुखेल. त्यामुळे सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एकंदरीतच या लग्ननावर अनेक मीम्सही बनत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे जुने अफेअरही चर्चेत आले आहे.

भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी

आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

Nagpur | धोकादायक ! आरोग्य सर्वेक्षणात बालकांचा लठ्ठपणा वाढला, मुलींच्या गुणोत्तरात घट?