Nagpur | धोकादायक ! आरोग्य सर्वेक्षणात बालकांचा लठ्ठपणा वाढला, मुलींच्या गुणोत्तरात घट?

नागपूर शहरात मुलींच्या गुणोत्तरात घट झाल्याची बाब समोर आली आहे. 2015-16 मध्ये पुरुषांहून अधिक महिलाची संख्या होती. असे असताना पाच वर्षात चित्र पालटल्याचे दिसते. 2015-16 साली जारी झालेल्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात दर हजार पुरुषांमागे 1004 महिला होत्या. त्यानंतर मात्र लिंग गुणोत्तर खालावत गेले.

Nagpur | धोकादायक ! आरोग्य सर्वेक्षणात बालकांचा लठ्ठपणा वाढला, मुलींच्या गुणोत्तरात घट?
प्रातिनिधीक फोटो

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून मुले घरीच आहेत. त्यामुळं त्यांचा लठ्ठपणा वाढला आहे. तसेच बालकांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण 25 टक्क्कांनी वाढले आहे. शिवाय मुलींच्या गुणोत्तरात घट झाल्याचं दिसून येतंय. राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीय.

नागपूर शहरात मुलींच्या गुणोत्तरात घट झाल्याची बाब समोर आली आहे. 2015-16 मध्ये पुरुषांहून अधिक महिलाची संख्या होती. असे असताना पाच वर्षात चित्र पालटल्याचे दिसते. 2015-16 साली जारी झालेल्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात दर हजार पुरुषांमागे 1004 महिला होत्या. त्यानंतर मात्र लिंग गुणोत्तर खालावत गेले. मागील अनेक वर्षापासून बेटी बचाओ मोहीम राबविण्यात येते. देशभरात महिलांचे प्रमाण पुरूषांपेक्षा जास्त नोंदविले गेले. मात्र, नागपूर जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लिंग गुणोत्तर खालावले आहे.

चार वर्षांत दरहजारी 33 ने घट

2019-20 मध्ये दर हजार पुरुषांमागे 971 महिलांची नोंद झाली. सातत्याने मुलींच्या जन्मदरातदेखील घट होत आहे. राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या आवृतीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 2019-20 मध्ये हाच दर हजार पुरुषांमागे 971 महिला इतका कमी झाला. चारच वर्षात दर हजारी संख्येत 33 ने घट झाली आहे. प्रशासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित असताना ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. होणाऱ्या प्रत्येक जन्माची नोंद होणे अपेक्षित असते. नागपूर जिल्ह्यात सक्षम प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा असताना जन्म नोंदणीचे प्रमाणही घटले आहे. 2015-16 मध्ये 97.07 टक्क्यापर्यंत खाली घसरली.

86 टक्के मुली शाळेत जातात

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनेदेखील जिल्ह्याने अद्याप फारशी प्रगती केली नाही. सहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 86.5 टक्के मुलीच शाळेत जात आहेत. 2015-16 मध्ये हीच टक्केवारी 86 टक्के होती. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी झाले असतानाच मुलींच्या जन्मदरातदेखील घट झाल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. 2015-16 मध्ये दर हजारी मुलांमागे 926 मुलींचा जन्म झाल्याची नोंद झाली. देशातील अनेक मागासलेल्या मुलांमध्ये मुलींचा जन्म दर वाढत असताना नागपुरातील ही घट निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

Good News | Corona Death नातेवाईकांना तातडीची मदत, ऑनलाईन अर्ज सुविधा; मनपा उघडणार विशेष केंद्र

Nagpur | जय संताजी ! संत जगनाडे महाराजांना अभिवादन; कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून दिली शिकवण

Published On - 4:25 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI