भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी

वातावरणातील बदलामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने पिकांची विशेष काळजी घेण्याचे अवाहान केले आहे. आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागल्याने बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मुळे मजबूत करण्यासाठी त्याला मातीचे अच्छादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण होणार आहे. भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी बटाटा पिकाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : वातावरणातील बदलामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने पिकांची विशेष काळजी घेण्याचे अवाहान केले आहे. आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागल्याने बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मुळे मजबूत करण्यासाठी त्याला मातीचे अच्छादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण होणार आहे. भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी बटाटा पिकाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

असे करा भाजीपाल्याचे व्यवस्थापन

बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत असून करपा रोगाची लक्षणे दिसताच 45 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम डिथेन किंवा 2 ग्रॅम एम याचे मिश्रण करुन फवारणी करावी लागणार आहे. तर नर्सरीमध्ये टोमॅटो, फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली याची लागवड करायची असेल तर वातावरणाचा अंदाज घेऊनच करावी लागणार आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने या करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मध्यंतरी फळबागावर तर आता भाजीपाल्यावर हा रोग वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहेच पण योग्य व्यवस्थापन केले तरच भाजीपाल्यातून उत्पन्न मिळणार आहे.

मोहरी पिकाचा अशी घ्या काळजी

यंदा लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्याही महिन्याभराने उशिरा झाल्या आहेत. शिवाय मोहरीचा पेरा दाट झाला असेल तर मात्र, विरळणे गरजेचे आहे. अन्यथा आता पिक जोमात वाढेल पण त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. दाट पेरा झाला की, उत्पादन घटते. त्यामुळे 12 डिसेंबरपूर्वीच मोहरीचे विरळणे गरजेचे आहे. मोहरी विरळली की तणावर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते. उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून वेळीच मोहरीची मशागत झाली तर त्याचा फायदा उत्पादनात होणार आहे. सरासरी तापमानातील घट लक्षात घेता मोहरीच्या पिकातील पांढरे डाग आजारावर नियमितपणे लक्ष ठेवावे लागणार आहे. या हंगामात रब्बी हंगामातील कांदा लागवड केली जाते.

गव्हाचे सुधारीत वाण

यंदा रब्बी हंगामातील पेरण्या ह्या उशिरा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे उशिरा पण जोमाने येणाऱ्या वाणाचा वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये सुधारित जातींमध्ये डब्ल्यूआर 544, एचडी 3237, राज 3765, एचडी 3271, एचडी 3059, एचडी 3117, यूपी 2338, पीबीडब्ल्यू 373 आणि यूपी 2425 यांचा समावेश आहे. हे बियाणे हेक्टरी 125 किलो लागणार आहेत. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया महत्वाची आहे त्यामुळे गव्हाच्या प्रति किलो बियाणावर 2 ग्रॅम थायरम तर शेतजमिनीवर वाळवीचा प्रादुर्भाव होतो, तेथे क्लोरपायरिफास २० ईसी पेल्वा प्रति हेक्टर 5 लिटर फवारावे लागणार आहे.

कोबीमध्ये पान खाणाऱ्या अळीचा फैलाव

सध्याच्या वातावरणात कोबीच्या भाज्यांमध्ये पान खाणाऱ्या कीटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे सातत्याने त्यावर लक्ष असणे गरजेचे आहे. जर अळीचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र 10 ग्रॅम BT 1 लिटर पाण्यात किंवा 1 मिली पेनसयुक्त औषध हे 3 लिटर पाणी मिसळा आणि फवारणी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

अखेर शेतकऱ्यांनी घेतले मनावर : सोयाबीन विक्रीबाबत महत्वाचा निर्णय, काय झाला बाजारपेठेत बदल?

अवकाळीनंतर सावरल्या नाहीत द्राक्षबागा, आता हतबल शेतकरीच करतोय वाळलेल्या द्राक्षघडाची तोडणी

नुकसान होऊनही हेक्टरी 12 क्विंटल सोयाबीन, पीक कापणीचा अहवाल सादर आता मदतीचे काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI