अखेर शेतकऱ्यांनी घेतले मनावर : सोयाबीन विक्रीबाबत महत्वाचा निर्णय, काय झाला बाजारपेठेत बदल?

सोयाबीनचे दर सध्या तरी स्थिर असले तरी गेल्या काही दिवसातील चढ-उतार पाहता आता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्रीला सुरवात केली असल्याचे बाजारपेठेतील आवकवरुन दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 8 ते 9 हजार पोत्यांची होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांची आवक होत आहे.

अखेर शेतकऱ्यांनी घेतले मनावर : सोयाबीन विक्रीबाबत महत्वाचा निर्णय, काय झाला बाजारपेठेत बदल?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 3:38 PM

लातूर : सोयाबीनचे दर सध्या तरी स्थिर असले तरी गेल्या काही दिवसातील ( price fluctuations) चढ-उतार पाहता आता शेतकऱ्यांनी (emphasis on sales) टप्प्याटप्प्याने विक्रीला सुरवात केली असल्याचे बाजारपेठेतील आवकवरुन दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 8 ते 9 हजार पोत्यांची होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीमध्ये 15 हजार ( Soybean arrivals increase) पोत्यांची आवक होत आहे. दरातील बदल, सोयापेंडच्या आयातीची चर्चा आणि भविष्यात सोयाबीनचे दर किती वाढणार याचा सर्व अभ्यास करुन आता साठवणूकीपेक्षा विक्रीवरच भर देणार आहे. आता पर्यंत सोयाबीनची साठवणूक केल्याने 2 हजाराने दर वाढवून मिळाला पण आता जर दरामध्ये घसरण झाली तर मात्र, मोठे नुकसान होणार आहे. याधास्तीने सोयाबीन विक्रीवर भर दिला जात आहे.

काय आहे सोयाबीन दराचे भवितव्य ?

दिवाळीनंतर मागणी वाढली आणि आवक घटल्याने सोयाबीन कायम दर राहिला आहे. सोयाबीनला 8 हजाराचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, बाजारपेठेत सोयापेंडच्या आयातीच्या वावड्या आणि उन्हाळी सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र यामुळे जर मागणी घटली आणि आवक वाढली तर याचा दरावर परिणाम होणार आहे. शिवाय सोयाबीनचे दर हे 7 हजारापेक्षा अधिक होणार नसल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. शिवाय आता सोयाबीनची साठवणूक करुनही तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीनची विक्री करु लागला आहे.

झपाट्याने वाढली आवक

हंगामाच्या सुरवातीपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही कमीच राहिलेली आहे. दर वाढूनही शेतकऱ्यांनीच साठवणूकीवरच भर दिला होता. मात्र, गतआवठड्यात घटलेले दर आणि पुन्हा सोयापेंड आयातीच्या चर्चा यामुळे साठवणूक केलेले सोयाबीन टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. कारण गुरुवारी सोयाबीनला सरासरी दर 6 हजार 400 मिळाला असतानाही आवक मात्र, 15 हजार पोत्यांची झाली होती. आता पर्यंत 15 हजार पोत्यांची आवक क्वचितच झालेली आहे. बाजारपेठेतील असमतोल केंद्राचे निर्णय याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होत आहे.

चार दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर

गत आठवड्यात सोयाबीनचे दर घटल्यानंतर आता शेतकरी हे सावध झाले आहेत. 6 हजार 600 वर गेलेले सोयाबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले होते. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीवर भर देत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6400 वरच स्थिर राहिलेले आहे. यामध्ये घट होण्यापूर्वीच विक्री चांगली त्यामुळेच दर स्थिर असातानाही आवक ही वाढलेली आहे. शिवाय शेतकऱ्यांना मोठ्या प्रतिक्षेनंतर अपेक्षित दर हा मिळतही आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6541 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6400 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 6800, चमकी मूग 7100, मिल मूग 6450 तर उडीदाचा दर 7500, पांढरी तूर 6050 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

अवकाळीनंतर सावरल्या नाहीत द्राक्षबागा, आता हतबल शेतकरीच करतोय वाळलेल्या द्राक्षघडाची तोडणी

नुकसान होऊनही हेक्टरी 12 क्विंटल सोयाबीन, पीक कापणीचा अहवाल सादर आता मदतीचे काय?

थकीत ऊसबिलाचा प्रश्न पेटला, कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.