
गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाजारांची भूमिका साकरली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता विकीने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
‘छावा’ या सिनेमानंतर विकी कौशलची सर्वत्र वाह वाह होताना दिसत आहे. विकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सेटवरील अनेक आठवणी शेअर करताना दिसतो. नुकताच विकीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच हे फोटो शेअर करत विकीने, ‘एक मराठा लाख मराठा’ असे कॅप्शन दिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.
चित्रपटाने एकूण किती कमाई केली
‘छावा’ हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने २१ दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २१व्या दिवशी देखील चित्रपटाने ५.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४८३.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट ५०० कोटी रुपयांचा पल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘छावा’ सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे. येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.